गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी भक्त अनेक उपाय करतात. पण बाप्पाला नक्की कोणता अंक जास्त प्रिय आहे? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे. हा प्रश्न अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण करतो.
काही लोक १ हा अंक महत्त्वाचा मानतात, कारण तो बाप्पाच्या ‘प्रथम पूज्य’ पदाचे आणि ‘एकदंत’ रूपाचे प्रतीक आहे. तर काहीजण २१ या अंकाला विशेष मानतात, कारण या अंकात मोदक, दुर्वा आणि प्रदक्षिणा यांचा अनोखा संगम आहे. गणपतीला हे दोन्ही अंक का प्रिय आहेत, यामागील रंजक कथा जाणून घेऊया.
गणपतीला दोन अंक सर्वात प्रिय आहेत. यातील पहिला अंक एक (१) आणि दुसरा म्हणजे एकवीस (२१). या दोन्ही अंकांचे त्यांच्या आयुष्यात आणि पूजेमध्ये एक खास स्थान आहे. आपल्याला माहिती आहे की, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने होते. त्यामुळे ते नेहमीच पहिल्या स्थानावर असतात.
याच कारणामुळे १ हा अंक त्यांच्या ‘प्रथम पूज्य’ स्थानाचे प्रतीक मानला जातो. याशिवाय, गणपतीला ‘एकदंत’ म्हणूनही ओळखले जाते, कारण त्यांचा एक दात तुटलेला आहे. या ‘एकदंत’ स्वरूपामुळेही १ हा अंक त्यांच्याशी जोडला गेला आहे.
एक या अंकाचे महत्त्व समजल्यावर प्रश्न पडतो, की २१ मोदक किंवा २१ दुर्वांचेच महत्त्व का आहे? यामागे एक सुंदर कथा आहे. पौराणिक कथेनुसार, एकदा देवता आणि ऋषींनी गणपतीची पूजा केली.
त्यावेळेस त्यांनी गणपतीला अनेक वस्तू अर्पण केल्या. पण गणपतीने त्यातील केवळ मोदक आणि दुर्वा स्वीकारल्या. तेव्हापासून गणपतीच्या पूजेमध्ये मोदक आणि दुर्वांना खूप महत्त्व प्राप्त झाले.
संख्याशास्त्राप्रमाणे, २१ हा अंक खूप खास आहे. २ आणि १ यांची बेरीज ३ होते. ३ हा अंक हिंदू धर्मातील त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे. यामुळेच २१ ही संख्या पूर्णत्व आणि देवत्वाचे प्रतीक मानली जाते.
शेवटची, २१ वी वस्तू प्रत्यक्ष गणपती बाप्पा स्वतः स्वीकारतात. यामुळेच २१ मोदकांचा नैवेद्य, २१ दुर्वांची जुडी आणि २१ वेळा बाप्पांच्या नावाचा जप केला जातो. हा फक्त धार्मिक विधी नसून, यामागे एक वैज्ञानिक कारणही आहे.
दुर्वांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. मोदक हे पौष्टिक असतात. यामुळे, गणपतीची पूजा करताना या दोन्ही गोष्टींचा वापर केल्याने पर्यावरणाचे रक्षण होते. तसेच आरोग्यालाही फायदा होतो. त्यामुळे गणपती बाप्पाला २१ मोदक आणि २१ दुर्वा अर्पण करायला विसरु नका. हे फक्त एक धार्मिक विधान नसून, ती श्रद्धा आहे. जी भक्त आणि देव यांना एका अतूट नात्याने जोडते.