swt35.jpg
89210
कुडाळः ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे आमदार नीलेश राणे यांनी दर्शन घेतले.
कुडाळात ‘सिंधुदुर्ग राजा’ चरणी
आमदार राणेंकडून महाआरती
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ः येथील ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे आमदार नीलेश राणे यांनी दर्शन घेतले. आमदार राणे यांनी पुरोहितांच्या उपस्थितीत श्री गणेशाची पूजा करून महाआरती केली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नीलेश राणे मंत्री व्हावेत, असे साकडे घातले.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, ओंकार तेली व अरविंद करलकर, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे व दीपक नारकर, शहरप्रमुख अभी गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, श्रुती वर्दम, देवेंद्र नाईक, चेतन पडते, नागेश नेमळेकर, सागर वालावलकर, स्वरुप वाळके, अनिकेत तेंडुलकर, रेवती राणे, अवधूत सामंत, राकेश कांदे, प्रसन्ना गंगावणे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार राणे यांनी, आम्ही सिंधुदुर्ग राजाच्या मंडळाची स्थापना केली; अडचणी दूर करण्याचे काम गणरायांनी केले आहे, असे सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशावर कोणतेही संकट येऊ नय. सर्वांना सुखात आनंदात ठेव, असे साकडे बाप्पा चरणी घातले.