वडगाव मावळ, ता. ५ : वडगाव मावळ पोलिस स्टेशनच्या परिसरात काही बेवारस वाहने पडून असून, या वाहनांच्या मूळ मालकांनी आपल्या वाहनांची ओळख पटवून सात दिवसात ही वाहने घेऊन जावीत अन्यथा या वाहनांचा लिलाव केला जाईल अशी माहिती पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली. वडगाव पोलिस स्टेशन परिसरात चार ऑइल वाहतुकीचे ट्रक (टँकर) पडून असून त्यांचे वाहन क्रमांक व चॅसीस क्रमांक दिसून येत नाहीत. या बेवारस वाहनांची मुद्देमाल निर्गती मोहिमेअंतर्गत विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. या वाहनांच्या मूळमालकांनी आपल्या वाहनाची ओळख पटवून मूळ आर. सी. बुक व आधारकार्डसह सात दिवसांच्या आत वडगाव मावळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुमार कदम तसेच मुद्देमाल कारकून पोलिस हवालदार संदीप बंडाळे यांच्याशी संपर्क साधावा व आपले वाहन घेऊन जावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक कदम यांनी केले आहे. अन्यथा आपण वाहन ताबा घेण्यास इच्छुक नाही, असे समजून या वाहनांबाबत कायदेशीर कारवाई करून लिलाव करण्यात येईल, अशी माहिती कदम यांनी दिली.