खारघर : लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली असली तरी खारघरमधील खड्डेमय रस्त्यांमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण झाले असले, तरी पावसाळ्याच्या पहिल्याच सरींनंतर डांबर वाहून गेल्याने रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
पनवेलमहापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात १०७ कोटी रुपयांचे काँक्रीटीकरण, तर १६ कोटी रुपयांचा खर्च डांबरीकरणासाठी मंजूर केला. या कामांवर नागरिकांनी सुरुवातीला कौतुक केले होते, मात्र एप्रिल-मे महिन्यात झालेल्या डांबरीकरणाचे डामडोल झाले असून, जून-जुलैमध्ये पावसाने सर्व डांबर वाहून नेले. परिणामी रस्त्यांवर सर्वत्र खड्डे दिसून येत आहे.
Ganeshotsav Cyber Awareness : गणेशोत्सवात सायबर जनजागृती! फसवणूक टाळण्यासाठी भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहनसेक्टर-३, ४, ७, ८, १०, ११, १२, १३, १९, २० ते ३०-३५ वसाहतींमध्ये रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पालिकेकडे निवेदने देऊन दुरुस्तीची मागणी केली, मात्र प्रशासनाने केवळ आश्वासने दिली, मात्र कामाचा दर्जा सुधारला नाही. उलट गणेशोत्सवात केलेली तात्पुरती दुरुस्तीही पावसात वाहून गेल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.
नागरिक व संघटनांचा संतापलीना गरड (अध्यक्षा, कॉलनी फोरम) म्हणाल्या, निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचे व्हिडिओ पालिकेला दिले होते. तरीही ठेकेदारांवर कारवाई झालेली नाही, तर कीर्ती मेहरा (सामाजिक कार्यकर्त्या) म्हणाल्या, खड्ड्यांमुळे दुचाकी अपघातांत वाढ झाली आहे. नागरी सुविधांकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. तेजस्वी घरत (सहचिटणीस, शेकाप) यांनी मागणी केली की, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा, तर मंगल कांबळे (अध्यक्षा, स्वच्छ खारघर फाउंडेशन) यांनी प्रशासनावर ताशेरे ओढत, रस्त्यांबरोबरच अनधिकृत फलकांनी शहराची अवस्था बकाल झाली आहे, असे सांगितले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स पुस्तकाची सुरूवात कुणी आणि कधी केली? आताचे मालक कोण? कमाई कशी होते? प्रमुख ठिकाणी खड्ड्यांची रेलचेलहिरानंदानी पूल ते उत्सव चौक मार्ग : काँक्रीटीकरणाचे काम महिन्यांपासून प्रलंबित; वाहतूक कोंडी गंभीर.
उत्सव चौक ते तळोजा रस्ता : मोठमोठे खड्डे, दुचाकीचालकांना धोका.
डीमार्ट व डेलीबाजार रस्ता : पावसामुळे निकृष्ट काम उघड झाले.
टाटा हॉस्पिटल ते प्रशांत कॉर्नर : खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास.