लोगो.......... टिळक आळी गणेशोत्सव शताब्दी
rat५p३०.jpg-
P२५N८९७२५
टिळक आळी गणेशोत्सव आगमनाची शिस्तबद्ध मिरवणूक. (संग्रहित छायाचित्र.)
---
गणेश आगमन मिरवणुकीचा प्रारंभ पारंपरिक
अभ्यंकर याचे घरापासून सुरुवात; लयबद्ध लेझिम, शिस्तबद्ध ही वैशिष्ट्ये
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता.५ ः टिळक आळीतील पारावरील गणेशोत्सवातील गणेशाचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण असते. या मिरवणुकीची परंपरा आहे. शिस्तबद्ध अन् सवंगतेला कोठेही थारा नसतो. लयबद्ध लेझिम नाद आणि लयबद्ध पावले चालत असतात. आगमन मिरवणुकीचा प्रारंभ टिळक आळीच्या नाक्यावरील गोविंदराव अभ्यंकर यांच्या घरापासून होतो, अगदी आजही.
याविषयी माहिती देताना सहा दशकाहून अधिक काळ उत्सवाशी संबंधित असलेले धनंजय भावे यांनी सांगितले की, श्रींच्या आगमनाची आणि विसर्जन मिरवणूक हा तर टिळक आळी गणेशोत्सवाचा प्राण आहे. श्रीगजाननाची मूर्ती जेथे तयार होत असे ते सर्वच मूर्तिकार पिंपळपार देवस्थानपासून अगदी जवळच होते. तरीही आगमन मिरवणुकीसाठी श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सकाळी श्रीगजाननाची मूर्ती टिळक आळीच्या नाक्यावरील गोविंदराव अभ्यंकर यांच्या घरात प्रथम स्थानापन्न होत असे आणि त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी आगमन मिरवणुकीला प्रारंभ होत असे. बाजारपेठ-गोखलेनाका–स्वातंत्र्य लक्ष्मीचौक (आता स्वातंत्र्यवीर सावरकर चौक) मार्गे झाडगाव अभ्यंकर नाका–पिंपळपार देवस्थान येथे येऊन देवळामध्ये मूर्ती स्थानापन्न होत असे. अभ्यंकरांचे जुने घर आता नवीन झाले तरीही आगमन मिरवणुकीचे प्रारंभ स्थान आजही बदलेले नाही हे विशेष.
कदाचित त्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सर्वसामान्य जनतेजवळ व्यापक जनसंपर्क साधला जाऊन अधिकाधिक जनजागृती होणे असाही उद्देश असावा असे वाटते, अशी पुस्ती भावे यांनी जोडली. अभ्यंकरांच्या घरावरून एक आठवण याच कुटुंबातील डॉ. जयंत अभ्यंकर यांची आली नाही, असे होणारच नाही. सुरुवातीच्या कालावधीमध्ये टिळक आळीच्या गणेशोत्सवामध्ये छोटे-मोठे नाट्यप्रवेश कार्यकर्त्यांना घेऊन केले होते. रत्नागिरीमध्ये डेन्टिस्ट म्हणून क्लिनिक सुरू केले खरे; पण त्यांच्यातील अभिनयाची आवड त्यानां स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच त्यांनी कार्यकर्त्यांकडूनच तीन अंकी नाट्यप्रयोग गणेशोत्सवामध्ये सादर करण्यास सुरुवात केली. अश्रूंची झाली फुले….अपराध मीच केला… इथे ओशाळला मृत्यू अशा प्रकारचे आव्हानात्मक नाट्यप्रयोग डॉ. जयंत अभ्यंकर यानी त्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली गणेशोत्सवामध्ये सादर केले. कालांतराने एक अव्वल दिग्दर्शक म्हणून नाव मिळवले. याचे श्रेय ते नेहमीच टिळक आळी गणेशोत्सवाच्या हौशी रंगभूमीला देत असत.
-----
आगळी नेहमी ठरते
आजही ''श्रीं’ ची आगमन मिरवणूक अभ्यंकर यांच्या घराजवळून सुरू होणे ही ६०-७० वर्षाहून अधिक काळ चाललेली परंपरा गणेशोत्सव मंडळाने जपून ठेवली आहे, हे लक्षणीय आहे. आजही वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने लेझिम-ताशे-मृदुंग, भजन यांच्या जल्लोषात या उत्सवाची आगमन आणि विसर्जन मिरवणूक निघते.
---
चौकट
शिर्के यांच्याकडून गाडी
आणखी एक आठवण सांगताना भावे म्हणाले, श्रींच्या आगमन मिरवणुकीसाठी कै. शिर्के (आर. बी. शिर्के वाहतूक कंपनीचे) यांच्याकडून एक छोटीशी म्हणजे अगदी काडेपेटीसारखी दिसणारी गाडी अनेक वर्षे दिली जात होती. त्यावर सूरमाडाच्या दोन झावळ्या बांधून गाडीची सजावट केली जात होती. अगदी नैसर्गिक सजावटीमध्येसुद्धा श्री गजाननाची मूर्ती शोभून दिसत असे.