अजित आगरकरसमोर पठ्ठ्याची १९७ धावांची खेळी; रिषभ पंतला 'बदली' खेळाडू म्हणून आला अन् पक्की करू पाहतोय टीम इंडियातील जागा
esakal September 06, 2025 03:45 PM
  • भारतीय संघात रोहित, विराट आणि अश्विन यांच्या निवृत्तीनंतर नव्या खेळाडूंमध्ये कसोटी व T20 संघासाठी कडवी स्पर्धा आहे.

  • आशिया चषकासाठी निवडलेल्या १५ खेळाडूंमध्येही अंतिम ११ साठी टक्कर दिसते आहे.

  • दुलीप ट्रॉफी उपांत्य फेरीत एन जगदीशनने उत्तर विभागाविरुद्ध १९७ धावांची शानदार खेळी केली.

N Jagadeesan’s Record Knock Puts Pressure on Rishabh Pant’s Place : भारतीय संघात कर्णधारपदापासून ते प्रत्येक जागेसाठी कडवी चुरस पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन यांच्या निवृत्तीनंतर कसोटी व ट्वेंटी-२० संघात जागा पटकावण्यासाठी युवा खेळाडूंमध्ये शर्यत लागली आहे. त्यामुळे आता संघात असलेल्यांची जागा पक्की मानली जात नाही.

भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईत पोहोचला आहे आणि त्यासाठी निवडलेल्या १५ खेळाडूंमध्येही अंतिम ११ साठी टक्कर आहे. अशात पुढील महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात दावा ठोकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत दक्षिण विभाग विरुद्ध उत्तर विभाग यांच्यात उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे आणि या स्पर्धेत दमदार कामगिरी करून टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी सर्व खेळाडूंनी दंड थोपटले आहेत. त्यात हा सामना पाहण्यासाठी निवड समिती प्रमुख अजित आगरकर व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आले असतील तर... आगरकर व लक्ष्मण यांना प्रभावीत करणारी खेळी करण्यात यष्टिरक्षक-फलंदाज एन जगदीशन याने यश मिळवले आहे.

Asia Cup 2025 : भारत, पाकिस्तानसह सर्व ८ संघ जाहीर; कोणती टीम तगडी, कुठे Live पाहता येणार? सामन्यांच्या वेळेत झाला बदल

इंग्लंड दौऱ्यावरील पाचव्या कसोटीत रिषभ पंतच्या जागी बदली खेळाडू म्हणून संघात बोलावण्यात आलेल्या एन जगदीशनने ( N Jagadeesan) दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत उत्तर विभागाविरुद्ध १९७ धावांची अविस्मरणीय खेळी केली. तन्मय अग्रवालसह सलामीला येताना जगदीशनने १०३ धावांची भागीदारी केली. अग्रवाल ९९ चेंडूंत ४३ धावांवर बाद झाला. देवदत्त पडिक्कलनेही दुसऱ्या विकेटसाठी जगदीशनसह १३२ धावा जोडल्या. पडिक्कलने ७१ चेंडूंत ५७ धावांची खेळी केली.

कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन ( ११) व एम काळे ( १५) स्वस्तात माघारी परतले, तरीही जगदीशन मैदानावर पक्क्या निर्धाराने उभा राहिला. तो द्विशतकाच्या जवळ पोहोचला होता, परंतु दुर्दैवाने तो रन आऊट झाला. त्याने ३५२ चेंडूंत १६ चौकार व २ षटकारांसह १९७ धावांची खेळी केली. त्यानंतर तनय थ्यागराजनने ( ५८) चांगला खेळ केला आणि संघाला ५३६ धावांपर्यंत पोहोचवले.

Shreyas Iyer ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची जागा घेणार? भारतीय क्रिकेटपटूचं मोठं विधान...

जगदीशनचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्याने ५२ प्रथम श्रेणी सामन्यांत ४७.५० च्या सरासरीने ३३७३ धावा केल्या आहेत. ३२१ ही त्याच्या वैयक्तिक धावसंख्येसह त्याच्या नावावर १० शतकं व १४ अर्धशतकं आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये ६४ सामन्यांत ४६.३३ च्या सरासरीने त्याने २७२८ धावा केल्या आहेत. त्यात ९ शतकं व ९ अर्धशतकं आहेत आणि २७७ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. शिवाय ६६ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याने १४७५ धावा केल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.