हा तर चमत्कारच! गुराख्याला पडले स्वप्न नि 19 वर्षानंतर गायब झालेल्या महिलेचा असा लागला शोध, सर्वच झाले अचंबित
GH News September 06, 2025 04:13 PM

जगात रोज कोट्यवधी लोक गायब होतात. काहींची माहिती मिळते. काही सापडतात. तर काहींचा चेहरा त्यांच्या कुटुंबियांना आयुष्यात कधीच पाहायला मिळत नाही. पण अमेरिकेत एक चमत्कार घडला आहे. हो, एका स्वप्नामुळे 19 वर्षांपूर्वी गायब झालेली एक गिर्यारोहक सापडली. तिने दोन दशकानंतर एका गुराख्याच्या स्वप्नात येत ती जागा दाखवली नि पुढे जे झाले, त्याने सर्वच अचंबित झाले.

प्रवासात अचानक गायब झाली मिशेल

मिशेल वानके ही 24 सप्टेंबर 2005 रोजी मित्र एरिक सॉयर याच्यासोबत कोलोरॅडो येथील पवित्र क्रॉस पर्वताकडे निघाली. चार मुलांची आई असलेली मिशेल त्यावेळी 35 वर्षांची होती. 14,007 फूट उंच पर्वतावर त्यांनी चढाई सुरू केली. तिचे हे पहिलेच गिर्यारोहण होते. तिला उंचीची भीती वाटत होती आणि त्यावर तिला मात करायची होती. सॉयर याच्या पाठोपाठ मिशेल चढाई करत होती. मिशेलने सॉयर याला पुढे जाण्यास सांगितले आणि थोड्या वेळानं आपण शिखरावर येऊ असं सांगितलं. सॉयर हा चढाई करुन तिची वाट पाहु लागला. बराच वेळ झाल्यावरही मिशेल न आल्याने मग तो परतीच्या वाटेवर निघाला. पण मिशेल त्याला कुठेच दिसली नाही.

एका स्वप्नाने झाला खुलासा

पोलीस, मित्रमंडळी, नातेवाईकांनी या डोंगर परिसरात तिचा शोध घेतला. पण काहीच फायदा झाला नाही. पुढे 19 वर्षे लोटली. मिशेलचा थांगपत्ता लागला नाही. पण 2023 मध्ये हिवाळ्यात एका स्वप्नामुळे चमत्कार झाला. मिशेलसाठी एक शोध पथक तयार करण्यात आले होते. त्यात स्कॉट बीबी हे सुद्धा स्वयंसेवक होते. त्यांना एका रात्री स्वप्न पडलं. त्यात मिशेल त्याला दिसली. त्याला दोन तीन दिवस ती दिसली आणि महिला पथकाने आपला शोध घेण्याची विनंती तिने केली.

स्कॉट यांच्या स्वप्नाची सुरुवातीला अनेकांनी थट्टा केली. पण मिशेल यांचे पती बेन यांनी ती गोष्ट मनावर घेतली. मग वेल माऊंटेन रेस्क्यूने एक सहा महिलांची तुकडी तयार केली. हे पथक पुन्हा या पर्वतरांगेत तिचा शोध घेऊ लागले. ज्या दिशेने मिशेलने चढाई केली. त्याच्या उत्तर-पूर्व भागात एका निसरट्या वाटेवर एरिका जर्मन हिला एक लाल कपडा, निळ्या रंगाचे मिटन, एक स्की पोल, बॅकपॅक मिळाले. या सर्व वस्तू मिशेलच्या होत्या. तर थोड्याच अंतरावर तिचा सापळा सुद्धा मिळाला. तिथेच एक हार मिळाला. जो तिच्या पतीने या डोंगर सफारीपूर्वीच तिला भेट म्हणून दिला होता. या घटनेची स्थानिक माध्यमांत मोठी चर्चा झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.