swt430.jpg
89613
सावंतवाडीः येथील तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सेवा पंधरवडा आणि ॲग्रीस्टॅक नोंदणीचा आढावा घेतला.
सेवा पंधरवड्याचे
काटेकोर नियोजन करा
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशः सावंतवाडी, दोडामार्गमध्ये आढावा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ः छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा उत्साहात साजरा होणार आहे. या काळात पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन काटेकोरपणे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सावंतवाडी व दोडामार्ग तहसील कार्यालयांना भेट देऊन सेवा पंधरवडा आणि ॲग्रीस्टॅक नोंदणीचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, सावंतवाडी तहसीलदार श्रीकृष्ण पाटील, दोडामार्ग तहसीलदार प्रज्ञा राजमाने आदी उपस्थित होते. धोडमिसे म्हणाल्या, “या उपक्रमाद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त सेवांचा लाभ मिळावा यासाठी सर्व विभागांनी सज्ज राहणे आवश्यक आहे. ॲग्रीस्टॅक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखील विशेष प्रयत्न करावेत.”
तसेच गाव नकाशावरील नोंद असलेले व प्रत्यक्ष वापरात असलेले रस्ते शोधून त्यांचे सर्वेक्षण व सीमांकन करण्याचे निर्देशही त्यांनी महसूल विभागाला दिले.