‘आयुष्मान, जनआरोग्य
कार्डचे उद्दिष्ट पूर्ण करा’
रत्नागिरी, ता. ५ ः आयुष्मान कार्ड व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य कार्डची संख्या वाढवून कुटुंबांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी आरोग्ययंत्रणा कार्यरत करा. आशा वर्कर यांची मदत घेऊन तालुकानिहाय गतीने काम करा. रत्नागिरी जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये यायला हवा, अशा पद्धतीने आवश्यक ते महिनाभरात दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या.
एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या अंतर्गत जिल्हाधिकारी सिंह यांनी आज तालुकानिहाय आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी आयुष्मान कार्ड व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना कार्ड किती प्रलंबित आहेत, याचा आढावा तालुकानिहाय घेतला.
---