Maratha Reservation Row : आमच्या मराठा बांधवांची जरांगेंनी फसवणूक केली; मिस्टर सदावर्तेंसह मिसेस सदावर्तेंही भडकल्या...
esakal September 04, 2025 02:45 PM

Government GR on Hyderabad Gazette : राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा जीआर काढला आहे. सरकारच्या या निर्णयावर आता ओबीसी संघटनांसह अनेकांकडून टीका होते आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांनीही नाराजी व्यक्त करत मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सरकारचा जीआर कायद्याच्या पातळीवर चुकीचं असल्याचं सांगितलं. तसेच मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असून त्यांनी जरांगेंच्या भूलथापांना बळी पडू असेही त्या म्हणाल्या. याशिवाय मोदींनी दिलेलं आरक्षण खरं आरक्षण आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Gunratna Sadavarte : संविधानाच्या राज्यात पाटीलकी चालत नाही, विखे पाटलांनी घोटाळा केलाय; सदावर्तेंचा घणाघात

यावेळी बोलताना डॉ. जयश्री पाटील म्हणाल्या, एकीकडे मनोज जरांगे स्वत: गादीवर झोपले, दुसरीकडे मराठा बांधव पावसात भिजत होते, हेच का उपोषण आहे का? जरांगेंनी माझ्या मराठा बांधवांची फसवणूक आणि छळ केला आहे. ते समाजाच्या मागे लपून दिशाभूल करत आहेत. अशा प्रकारे दबाव, दडपशाहीने सरसकट ओबीसीत समावेश होऊ शकत नाही.

''मी माझ्या बांधवांना सांगेन, तुम्ही अभ्यास करा, मोदींनी दिलेलं आरक्षण खरं आरक्षण आहे. अभ्यास करून तपासा. ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे तेच खरं आहे. त्याचा मराठा समाजाला किती फायदा झाला आहे ते बघा. जरांगेंच्या भूलथापांना बळी पडू नका.'', अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Gunaratna Sadavarte : इतिहास माहिती असावा लागतो, अनुकरण शब्दाचा अर्थ माहितीय का? सदावर्तेंची उदयनराजेंवर टीका

''मनोज जरांगे आई-बहिणीला बोलतो. नीचपणाचं वर्तन आहे. त्यांनी आधी त्यांच्यातला मीपणा संपवला पाहिजे. आरक्षण कायद्याच्या चौकटीत राहून घ्यायला हवं होतं. त्याबाहेरचं बांधवांना काय देणार, आता त्यांनी त्यांची नाटकं बंद करायला हवी. जरांगेंनी खोटा गुलाल उधळला'', अशी टीकाही त्यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.