फैय्याज शेख
भिवंडी : कर्तव्यावर असलेल्या पोलिस हवालदाराला मारहाण करून त्यांचा मोबाईल जबरीने हिसकावून नेण्यात आल्याची घटना भिवंडीत घडली होती. पोलिसाला मारहाण करणाऱ्या चौघांच्या टोळक्याला बेड्या ठोकण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी टोळक्याच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली आहे.
भिवंडीच्या कोनगाव पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत असलेले सुनील पाटील हे २७ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कर्तव्य बजावून घरी परत येत असताना पाऊस सुरु झाला. यामुळे ते कल्याण बायपास रस्त्यावरील वेल्डींग ऑटो गॅरेज सलमान हुड मेकर या दुकानाच्या शेड खाली उभे राहिले. त्यावेळी त्यांच्या मागून आलेल्या मोटार सायकल चालक धीरजने पोलिससुनील पाटील यांच्यासोबत पार्किंग वरून वाद घातला होता.
Raigad Crime : माणगावमध्ये सशस्त्र दरोडा; २० ग्राम सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची हत्यापोलिसाला शिवीगाळ करत मारहाण
वाद वाढत गेल्याने धीरज याच्या समवेत चौघांनी पोलिस सुनील पाटील यास शिवीगाळी करून मारहाण केली होती. इतकेच नाही तर त्यांचा मोबाईल हिसकावून या चौघांनी येथून पळ काढला होता. या प्रकरणी पोलीस हवालदार सुनील पाटील यांनी पोलिसात जाऊन या बाबत तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तांत्रिक तपास करत असताना गुप्त बातमीदारा मार्फत चौघांची माहिती काढली.
Nandurbar : धार्मिक कार्यक्रमात जेवणातून संपूर्ण गावाला विषबाधा; नंदुरबार तालुक्यातील घटनाचौघांना अटक करत मुद्देमाल जप्त
यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार चारही आरोपींची ओळख पटवून चौघांना अटक केली. यात धिरज रामचंद्र भोये (वय २१), हितेश दिलीप भोये (वय २१), बळीराम रामदास चौधरी (वय २३), नितीन उर्फ सुशांत सुरेश लाहरे (वय २३, सर्व मूळ रा.जव्हार, पालघर) यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल, ९० हजार रुपयांच्या दोन मोटर सायकली असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.