राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने चालणाऱ्या विविध संघटनांची अखिल भारतीय समन्वय बैठक येत्या ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान जोधपूरातील लालसागर येथे होणार असल्याचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले. या बैठकीत संघाशी संबंधित ३२ संघटनांचे पदाधिकारी आणि महिला कार्य संदर्भात समन्वय पाहणाऱ्या कार्यकर्ता देखील सहभागी होतील. एकूण ३२० कार्यकर्ता या बैठकीत सहभाग घेतील. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे आणि सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, सीआर मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त चक्रधर, अतुल लिमये, आलोक कुमार सहित अन्य वरिष्ठ पदाधिकारी देखील उपस्थित राहातील.
या बैठकीत विविध संघटनाचा वार्षिक कार्यवृत्त सादर केले जाणार आहे. त्यात वर्षभराचा अनुभव आणि कामगिरीचा तपशील देखील सामील केलेला असेल. त्यात एबीव्हीपी, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ, विद्या भारती आणि सक्षम ( दिव्यांगासाठी कार्यरत ) अशा संघटना सामील होती. देशातील विभिन्न क्षेत्र विशेषकरुन पंजाब, बंगाल, आसाम आणि पूर्वोत्तर आदिवासी क्षेत्रातील सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर देखील चर्चा होईल. यासोबत पंच परिवर्तन- सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण अनुकुल जीवन, स्व आधारित रचना आणि नागरिक कर्तव्य पालन सारख्या विषयांवर चर्चाविनिमय होईल.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० विभिन्न संघटनांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला जाईल आणि शिक्षण क्षेत्राला नवीन दिशा देण्याबाबत विचार केला जाईल. आदिवासी समाजात होत असलेले सकारात्मक बदल आणि त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या प्रयत्नांचा देखील आढावा घेतला जाईल. तसेच आगामी शताब्दी वर्षे ( २०२५-२६ ) कार्यक्रमाच्या रुपरेषेवर चर्चा होईल. २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमीच्या दिनी नागपूरातून प्रारंभ होऊन मंडळ, ग्राम आणि वस्ती पातळीवर स्वयंसेवकांद्वारे गणवेशात विजयादशमी उत्सव साजरा केला जाईल.
शताब्दी वर्षात देशभरात हिन्दू संमेलन, गृह संपर्क, सद् भाव बैठका, प्रमुख नागरिक चर्चासत्र आणिर युवा कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या बैठका कोणत्याही निर्णयासाठी होत नाहीत तर संघटनांदरम्यान चर्चा, अनुभवाचे अदान-प्रदान आणि योग्य समन्वयाचा माध्यम असतात. येथे मिळालेले विचार आणि प्रेरणेच्या आधारावर प्रत्येक संघटना आपल्या स्तरावर निर्णय घेऊन पुढील कार्यांना दिशा देते. अलिकडे दिल्लीत झालेल्या सरसंघचालकांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व वर्गांपर्यंत संघाचे विचार पोहचवण्याच्या प्रयत्नांना आणखी गती देण्याची ही एक महत्वाची संधी मानली जात आहे.