Water Supply Cut: ठाणे जिल्ह्यात ६ तास पाणी पुरवठा बंद, कधी आणि कुठे?
esakal September 05, 2025 05:45 AM

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्र येथे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने मंगळवारी कल्याण डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत या दोन्ही शहरांचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १५० द.ल.ली मोहिली उदंचन केंद्र (नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र) व १०० द.ल.ली. मोहिली जलशुद्धीकरण केंद्राला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत टाटा पॉवर कांबा सबस्टेशन येथून विद्युत पुरवठा केला जातो. टाटा पॉवर कांबा सबस्टेशन मधील एनआरसी २ फीडरच्या देखभाल दुरुस्तीचे काम मंगळवारी केले जाणार आहे. यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत शट डाऊन घेण्यात येणार आहे.

kokannagar Govinda Pathak: १० थरांची 'वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद', कोकणनगर गोविंदा पथकाचा पराक्रम

या दिवशी वीज पुरवठा बंद राहणार असल्याने मोहिली व नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणार नसल्याने मोहने उदंचन केंद्र, बारावे जल शुद्धीकरण केंद्र येथील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामामुळे पालिकेच्या बारावे, मोहिली व नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मांडा टिटवाळा, आंबिवली, शहाड, अटाळी या भागास पाणी पुरवठाबंद राहणार आहे.

गणेशोत्सवात धारावीत बत्ती गुल

धारावीत गणेशोत्सवाची धूम चालू आहे. मात्र, गेली काही दिवसांपासून धारावीतील संत कक्कया मार्गावरील दगडी बिल्डिंग, कवडे चाळ, शास्त्री नगर, ढोर वाडा आदी विभागात अचानक वीज बंद होण्याचे प्रकार घडत आहेत. गणेशोत्सव मंडळांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. यात वीज जाण्याचा प्रकार होत असल्याने मंडळे, भाविक व स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. धारावीत 'बेस्ट' प्रशासन विजेचा पुरवठा करत आहे.

तिरुपती बालाजीला दान केलेल्या केसांचे काय होते? आश्चर्यचकित करणारं सत्य...

दरदिवशी धारावीत विविध वस्त्यांमध्ये अचानक वीज जाते यामुळे संगणक, टीव्ही आदी विजेची उपकरणे बंद पडत आहेत. यामुळे स्थानिकांना आर्थिक भुर्दंडसोसावा लागत आहे. याचा फटका स्थानिक लघु उद्योग, घरगुती व्यवसायावर याचे दुष्परिणाम होत आहेत. यावर 'बेस्ट' प्रशासनाने कायमचा तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.