Sangli News: 'शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत राष्ट्रवादीचे शेडगेवाडीत आंदोलन'; काम ११ तारखेपर्यंत बंद
esakal September 05, 2025 05:45 AM

कोकरुड: शेडगेवाडी (ता. शिराळा) येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विराज नाईक यांच्या नेतृत्वात शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील विविध रस्त्यांबाबत मागण्यांसाठी ‘रास्ता रोको’ करण्यात आले.

Sangli News: 'महामार्ग विस्तारीकरण भूसंपादनाशिवाय सुरू'; शेतकऱ्यांचा आरोप; विटा, बस्तवडे फाटादरम्यान रस्त्याचे काम बंद पाडले

मेणी फाटा ते कोकरूड या राज्य मार्गावर गावांच्या गतिरोधक अथवा रॅम्बलर बसविले नसल्याने वाहने वेगाने धावत असून वारंवार अपघात होत आहेत. शेडगेवाडी फाटा ते चांदोली या रस्त्याचे काम दीड वर्षापासून सुरू आहे. ते निकृष्ट पद्धतीने केले जात आहे. निविदेप्रमाणे रुंदीकरण होत नाही. दोन्ही बाजूंनी रस्ता उरकल्याने प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.

मेणी फाटा ते धनगरवाडा (मणदूर) पर्यंत झालेल्या रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गतिरोधक व रॅम्बलर बसवणे व ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक उभारावेत, अशी मागणी आहे.

तीन तास चाललेले आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद चौधरी, नीलेश ढेरे (प्रकल्प उपविभाग, कऱ्हाड) यांनी ११ सप्टेंबरपर्यंत मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले. राज्य मार्गावर आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त होता.

बी. के. नायकवडी, शिवाजी पाटील, रंगराव शेडगे, डॉ. दिनकर झाडे, सुहास पाटील, आनंदराव पाटील, वसंत पाटील, विजय पाटील, सुरेश चिंचोलकर, महेश शेडगे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच डॉ. तानाजी पाटील, बजरंग वाघमारे, अशोक डिगे, वसंत पाटील, राजू खांडेकर, शंकर मोहिते, शिवाजी लाड, आबा पाटील, किसन आटुगडे, प्रकाश मकामले, बाबा गोळे, कोंडिबा चौगुले, विनोद पन्हाळकर उपस्थित होते.

Maratha Reservation : आजही अफगाणिस्तानला भरते मराठ्यांच्या नावाने धडकी, ३०० वर्षे 'म्हणी' मधून जीवंत आहे मराठ्यांचा दरारा काम ११ तारखेपर्यंत बंद

शेडगेवाडी ते चांदोली रस्त्याचे सध्या सुरू आहे. ते निकृष्ट होत असल्याचा आरोप आहे. आजच्या आंदोलनात आवाज उठवण्यात आला. ११ सप्टेंबर महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता अनिल सरगर येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करून आंदोलक कार्यकर्त्यांची भेट घेतील. तोपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती विराज नाईक यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.