माझ्या पुरुषापासून दूर हो…, कोणामुळे झालेलं मनिषा कोईरालाचं खासगी आयुष्य उद्ध्वस्त
Tv9 Marathi September 05, 2025 08:45 PM

Manisha Koirala Love Life: अभिनेत्री मनिषा कोईराला हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. एक काळ असा होता जेव्हा फक्त बॉलिवूडवर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील मनिषा हिने राज्य केलं. पण अभिनेत्री आज तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी, पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना मनिषा हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. एक दोन नाही तर 12 पुरुषांसोबत मनिषा कोईराला हिचे प्रेमसंबंध होतं. पण अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत असलेलं अभिनेत्रीचं नातं आजही चर्चेत आहे.

1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्नी साक्षी’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान नाना आणि मनिषा यांची पहिली भेट झाली. विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. 90 च्या दशकात मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर यांच्या नात्याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली होती.

असं म्हणतात की विवेक मुशरान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मनिषा हिचं नाव अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत जोडलं जाऊ लागलं. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांची ओळख झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी एकमेकांना गुपचूप डेट करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा नाना यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांची पत्नी निलाकांती पतीपासून वेगळ्या राहत होत्या.

View this post on Instagram

A post shared by RAW MANGO (@raw_mango)

‘अग्नी साक्षी’ सिनेमानंतर नाना पाटेकर यांनी ‘खामोशी’ सिनेमात एकत्र काम केलं. असं म्हणतात की, नाना आणि मनिषा यांच्या नात्याचं सत्य सर्वांना कळलं होतं. शिवाय शेजरच्यांनी देखील सांगितलं, नाना यांना अनेकदा अभिनेत्रीच्या घराबाहेर पडताना पाहिलं आहे.

असं देखील म्हटलं जातं की , नाना आणि मनिषा एकमेकांसाठी प्रचंड पझेसिव्ह होते. पण पत्नीला घटस्फोट देऊन मनिषा हिच्यासोबत लग्न करण्यास नाना यांनी नकार दिला होता. पण असं असताना देखील मनिषा, नाना यांच्या प्रेमात होती. पण नातं फार काळ टिकलं नाही.

एका प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांचं ब्रेकअप झालं. अभिनेत्री आयेशा झुल्का आणि नाना पाटेकर यांना एका बंद खोलीत पाहिल्यानंतर मनिषा संतापली आणि म्हणाली, ‘माझ्या पुरुषापासून दूर हो…’ असं देखील सांगितलं जातं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.