अभिनेत्री या कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तर सिनेमामधील रोलमुळे. नुकताच एका अभिनेत्रीने तिच्या बोल्ड सीन्सवर वक्तव्य केले आहे. तिने ‘मी सिनेमांत केलेल्या बोल्ड सीन्सच्या क्लिप्स आई-वडिलांना पाठवतात’ असे म्हटले आहे. तसेच तिने ट्रोलर्सला देखील धमकी दिली आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘एक हजारो में मेरी बेहना है’ मालिकेत काम करणारी क्रिस्टल डिसूजा आहे. तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये संताप व्यक्त केला आहे.
क्रिस्टलने नुकताच ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. ती म्हणाली तिच्या पालकांना तिच्या अनेक बोल्ड क्लिप्स एडिट करुन पाठवतात.
“जर कोणाला नाकाची सर्जरी करायची असेल तर त्यांनी करावी. जर नसेल करायची तर नका करु. हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. मी कधीच सर्जरी केलेली नाही. पण बेसिक ग्रुमिंग जसं की फेशियल, फिलर्स जे काही मला थोडा आत्मविश्वास देईल ते केलं आहे. जर मी माझ्याच नजरेत चांगली दिसू शकते तर याच्याशी तुमचं काहीही घेणं देणं नाही. ना यात तुमचा पैसा किंवा वेळ आहे आणि ना तुमच्या शरिराचा संबंध आहे. हे माझं आहे” असे क्रिस्टलने म्हटले आहे.
पुढे ट्रोलर्सला सुनवात ती म्हणाली, “हो, मी काही सिनेमांमध्ये, सीरिजमध्ये बोल्ड सीन केले आहेत. लोक तेवढेच सीन कट करुन माझ्या इन्स्टाग्रामवर मेसेज करतात. घाणेरड्या भाषेत टीका करतात.”
“माझ्यावर या सगळ्याचा खूप परिणाम होतो. माझे आई वडीलही सोशल मीडियावर आहेत. लोक त्यांनाही मेसेजमध्ये माझे व्हिडीओ पाठवतात. मग हे जेव्हा मला त्यांच्याकडून समजतं तेव्हा मला आणखी दु:ख होतं” असे क्रिस्टल पुढे म्हणाली.