Shilpa Shetty: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आर्थिक अडचणींमुळे वांद्रे येथील तिचे रेस्टॉरंट बंद करणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिल्पा शेट्टी हिच्या रेस्टॉरंटला टाळे लागणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहे. पण मागे नक्की सत्य काय आहे… यावर शिल्पाने मौन सोडलं आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत शिल्पा हिने रेस्टॉरंटबद्दल मोठी माहिती दिली आहे. अभिनेत्रीने सांगितलं आहे की, सध्या ती रेस्टॉरंट बंद करणार नाही आणि ते चालवण्यात कोणतीही आर्थिक समस्या नाही.
व्हिडीओमध्ये शिल्पाम्हणाली, ‘जुनं रेस्टॉरंट बंद करण्याऐवजी नवीन साऊथ इंडियन रेस्टॉरंट लवकरच सुरु करणार आहे. तर दुसरीकडे जुहू येथील ‘बास्टियन’ नावाचा आणखी एक रेस्टॉरंट सुरु करण्यात येणार असल्याचा माहिती शिल्पाने दिली आहे… शिल्पा शेट्टीनंतर, रेस्टॉरंटच्या अधिकृत पेजवरूनही एक निवेदन जारी करण्यात आलं. रेस्टॉरंटच्या अधिकृत पेजवर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
View this post on Instagram
A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)
अधिकृत पेजवर काय लिहिलं आहे…
रेस्टॉरंटच्या अधिकृत पेजवर लिहिलं आहे की, जेव्हा तुम्ही कठोर परिश्रम करून प्रसिद्धी मिळवता तेव्हा काही अफवा देखील तुमच्याशी जोडल्या जातात. आज आम्ही बास्टियन रेस्टॉरंटमध्ये खरा चहा देतो. वांद्रे येथून आमची खरी सुरुवात झाली. हे चॅप्टर बंद होतात आणखी दोन चॅप्टर सुरु होणार आहेत. जे तुमच्या प्रतिक्षेत आहेत. आमचा ब्रँड एक नवी वाटचाल सुरु करणार आहे… लवकरच याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल…
शिल्पा शेट्टी म्हणाली, बास्टियन वांद्रे आउटलेट आता ‘अम्माकाई’ नावाच्या दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये रूपांतरित होत आहे. हा ब्रँड जुहू येथे स्थलांतरित होत आहे आणि बास्टियन बीच क्लब पुन्हा सुरू होईल. असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे.
सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून शिल्पा वादाच्या भोवऱ्यात आहे. अनेकांनी अभिनेत्रीवर फसवणुकीसारखे गंभीर आरोप देखील लावले आहेत. अशात अभिनेत्री कंगाल झाली आहे.. अशी देखील चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागली. पण असं काहीही नसून शिल्पाचे लवकरच दोन रेस्टॉरंट सुरु होणार आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. शिवाय अनेक जण अभिनेत्रीला फोन करुन देखील विचारत आहेत.