Bigg Boss 19: अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस 19’ गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत येऊ लागला आहे. शोमधील स्पर्धकांमधील भांडणं, टास्कचे व्हिडीओ आणि फोटो देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्याम ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक रहस्य समोर येत आहेत. आता अभिनेत्री कुनिका सदानंद हिने देखील स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला होता. नुकताच झालेल्या एक एपिसोडमध्ये कुनिका हिने 27 वर्ष जुन्या रिलेशनशिपबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
सांगायचं झालं तर, भोजपुरी स्पर्धक निलम गिरी हिच्यासोबत कुनिका हिची चांगली मैत्री झाली आहे. अशात दोघे त्यांच्या रिलेशनशिपबद्दल बोलताना दिसत आहे. सर्वात आधी निलम तिच्या रिलेशनशिप आणि ब्रेकअपबद्दल मोठं वक्तव्य केलं. त्यानंतर कुनिका म्हणाली, ‘मी 27 वर्ष आमचं नातं लपवलेलं होतं… यावर तान्याने विचारलं तुमचं लग्न झालं होतं का? यावर कुनिका म्हणाली, ‘माही आम्ही लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होतो… तो विवाहित होता. पण स्वतःच्या पत्नीपासून विभक्त झालेला होता. त्यानंतर दुसऱ्या महिलेसोबत त्याच्या अफेअरबद्दल मला कळल्यानंतर मी त्याला सोडून दिलं..’
View this post on Instagram
A post shared by ColorsTV (@colorstv)
कुनिका हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, कुनिकाने मान्य केलं होतं की, अभिनेत्री दिग्गज गायक कुमार सानू यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. कुमार सानू आणि कुनिका एकमेकांना पती – पत्नी देखील मानत होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांना विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
एका मुलाखतीत खुद्द कुनिकाने कुमार सानू यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं होतं. पहिल्या मुलाखतीतच अभिनेत्रीचा कुमार सानू यांच्यावर जीव जडला होता. ‘कुमार सानू यांचे पत्नी रीता यांच्यासोबत वाद सुरु होते तेव्हा ते बहिणीच्या कुटुंबासोबत उटी याठिकाणी आले होते. आम्ही एकत्र बसून ड्रिंक देखील केली. त्यानंतर कुमार सोनू खिडकीतून उडी मारणार होते. तेव्हा आम्ही त्यांना खाली उतरवलं. त्या घटनेनंतर आमचं नातं अधिक घट्ट झालं..’ असं अभिनेत्री म्हणाली होती.
कुनिका हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण आता अभिनेत्री ‘बिग बॉस 19’ मुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर देखील कुनिका कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.