आपण अनेक सिरियल किलरबद्दल ऐकले आहे. पण कोणी हिल्ससाठी वेडा असल्याचे ऐकले आहे का? आज आम्ही तुम्हाला 1960च्या दशकातील अशाच एका सिरियल किलर बद्दल सांगणार आहोत जो महिलांची क्रूरपणे हत्या करायचा. हत्येनंतर त्यांचे पाय कापायचा. हे कापलेले पाय हिल्समध्ये सजवून घरात ठेवायचा. नंतर तो महिलांचे स्तन कापून बोट बनवायचा. हा सिरियल किलर लस्ट किलर म्हणून प्रसिद्ध झाला होता. आता नेमका हा कोण होता? चला जाणून घेऊया…
या किलरचे नाव जेरी ब्रूडोस (Jerry Brudos) असे होते. अमेरिकेतील ओरेगन राज्यात त्याची दहशत होती. जेरी ब्रूडोस हा ‘लस्ट किलर’ आणि ‘शू फेटिश स्लेअर’ म्हणून ओळखला जायचेा. तो केवळ महिलांची हत्या करायचा नाही, तर हत्येनंतर त्या महिलांचे पाय कापायचा आणि मग नमुने म्हणून कापलेले पाय हिल्समध्ये सजवायचा. त्याच्या भयानक कृत्यांबद्दल जाणून तुमचा थरकाप उडेल. चला, जाणून घेऊया या हैवानाच्या कर्मकांडाची संपूर्ण कथा…
4 महिलांची केली हत्या
जेरी ब्रूडोसचा जन्म 31 जानेवारी 1939 रोजी साउथ डकोटाच्या वेबस्टर येथे झाला होता. त्याची आई मेरी ईलीनला नेहमीच मुलगी हवी होती. पण जेरीच्या जन्मामुळे ती निराश झाली. त्यामुळे तिने जेरीला नेहमीच वाईट वागणूक दिली. जेरीची आई आपल्या मोठ्या मुलावर, जेम्सवर खूप प्रेम करायची. पण जेरीसाठी तिचे वागणे नेहमीच चुकीचे होते. वयाच्या पाचव्या वर्षी जेरीला एका अडगळीच्या ठिकाणी महिलांचे हाय-हिल शूज सापडले होते. तो ते शूज घरी घेऊन आला आणि घालण्याचा प्रयत्न करु लागला. जेव्हा त्याच्या आईला हे कळले, तेव्हा तिने रागात ते हिल्स जाळून टाकले. येथूनच ‘लस्ट किलर’ आणि ‘शू फेटिश स्लेअर’च्या कथेची सुरुवात झाली.
या घटनेनंतर जेरी शेजारच्या महिलांच्या घरात गुपचूप घुसून त्यांचे शूज आणि कपडे चोरू लागला. वयाच्या 17 व्या वर्षी जेरीने एका मुलीचे चाकू दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचे नग्न फोटो काढले. वयाच्या 22 व्या वर्षी त्याने लग्न केले आणि सलेम, ओरेगन येथे स्थायिक झाला. त्याची पत्नी डार्सी आणि दोन मुलांसह त्याचे जीवन बाहेरून सामान्य दिसायचे, पण सत्य काही औरच होते.
पाय कापून शूजचा संग्रह करायचा
1968 मध्ये जेरीने चार तरुणींच्या हत्या केल्या आणि दोन महिलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या शिकारी बहुतांश तरुण महिला असायच्या. पहिले तो त्यांचे अपहरण करायचा. नंतर तो त्या महिलांवर लैंगिक अत्याचार करायचा आणि मग गळा दाबून मारून त्यांची हत्या करायचा. त्याची पहिली शिकार होती 19 वर्षीय लिंडा स्लॉसन. जेरीने लिंडाला आपल्या घरी बोलावले आणि तिची हत्या केली. त्याने लिंडाच्या शरीराशी छेडछाड केली आणि तिचा डावा पाय कापून ठेवला. तो त्याने आपल्या हिल्सच्या संग्रहात ठेवला. इतकेच नाही तर, लिंडाचा मृचदेह कधीच सापडला नाही.
त्यानंतर जेरीने जैन व्हिटनी, करेन स्प्रिंकर आणि लिंडा सेली यांच्या हत्या केल्या. या सर्वांना त्याने गळा दाबून मारले आणि त्यांच्या शरीराचे काही भाग घरात सजवून ठेवले. तो हत्या करण्यापूर्वी महिलांचे फोटो काढायचा. नंतर त्यांचे कपडे घालायचा. एवढेच नाही, तो महिलांच्या स्तनापासून पेपर वेट बनवायचा.
कसा पकडला गेला जेरी?
मात्र, 1969 मध्ये जेरीच्या कृत्यांवर पोलिसांचे लक्ष गेले. मे महिन्यात एका मच्छिमाराला लॉन्ग टॉम नदीत लिंडा सेलीचा मृतदेह सापडला. काही दिवसांनंतर, करेन स्प्रिंकरचा मृतदेही त्याच नदीत सापडला. पोलिसांच्या लक्षात आले की, दोन्ही प्रेतांना बांधण्यासाठी वापरलेली दोरी आणि तांब्याच्या तारांचा वापर एका खास पद्धतीने केला गेला होता. पोलिसांनी ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनींशी चौकशी सुरू केली. कारण करेन एक विद्यार्थिनी होती. अनेक विद्यार्थिनींनी सांगितले की ती एका विचित्र माणसासोबत डेटवर गेली होती. तो माणूस स्वत:ला व्हियेतनाम युद्धाचा सैनिक सांगयचा. पोलिसांनी एक स्टिंग ऑपरेशन राबवले, ज्यामध्ये एका विद्यार्थिनीने जेरीला भेटण्याचे नाटक केले. जेरी तिथे पोहोचला तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
जेरीच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना अनेक धक्कादायक पुरावे सापडले. महिलांचे शूज, कपडे, फोटो आणि कापलेले शरीराचे अवयव. जेरीने आपले गुन्हे कबूल केले आणि तीन हत्यांसाठी दोषी ठरला. त्यानंतर त्याला एक किंवा दोन नव्हे, तर तीन आजीवन कारावासाच्या शिक्षा झाल्या. त्याने ओरेगन स्टेट पेनिटेंशियरीमध्ये त्या भोगल्या. जेरी ब्रूडोसने तुरुंगात 37 वर्षे घालवली. तो ओरेगन तुरुंगात सर्वात जास्त काळ होता. 28 मार्च 2006 रोजी वयाच्या 67 व्या वर्षी यकृताच्या कर्करोगाने त्याचा मृत्यू झाला.