Total Lunar Eclipse Blood Moon 2025 : पूर्ण चंद्र हवाय की अर्धचंद्र? या खास टिप्सद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये काढा चंद्रग्रहणाचे क्लासी फोटो
Tv9 Marathi September 06, 2025 12:45 AM

चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2025) 7 आणि 8 सप्टेंबर 2025 च्या रात्री दिसणार आहे. भारतातील आकाश निरीक्षक पूर्ण चंद्रग्रहण पाहतील, ज्याला ब्लड मून म्हणून ओळखले जाते. या ग्रहणात चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जाईल. हळूहळू एक खोल लाल आणि भगवी चमक घेईल. हा दिवस खगोलशास्त्रज्ञांसाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. हे ग्रहण तब्बल काही काळ चालणार आहे. हे उघड्या डोळ्यांनी सुरक्षितपणे पाहता येईल. सूर्यग्रहण हे आपण थेट डोळ्यांनी पाहून शकत नाहीत. मात्र, चंद्रग्रहणामध्ये काही समस्या नाही, आपण ते बघू शकतो. चंद्रग्रहणांना कोणत्याही संरक्षक उपकरणांची आवश्यकता नसते.

चंद्रग्रहण हे 7 सप्टेंबर 9:58 PM ला सुरू होणार आहे आणि 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1:26 वाजता संपेल. हे पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातही दिसेल. चंद्र दृश्यमान असलेल्या प्रदेशांमधील निरीक्षकांना प्रत्येक टप्प्याचा एक वेगळा अनुभव घेता येईल. जर तुम्ही हे चंद्रग्रहण मोबाईल फोन किंवा कॅमेऱ्यामध्ये कैद करणार असाल तर स्थिर ठेवण्यासाठी ट्रायपॉडचा वापर करा. ​​कॅमेऱ्यांसाठी, आवाज कमी करण्यासाठी कमी ISO असलेल्या मॅन्युअल सेटिंग्ज वापरा आणि जास्त एक्सपोजर टाळण्यासाठी शटर स्पीड करा.

चंद्रग्रहण सुरू होण्याच्या अगोदर तुमचा मोबाईल हा नाईट मोडवर टाका. चंद्रावर फोकस लॉक करू शकतात आणि स्थिर ठेवण्यासाठी स्मार्टफोन ट्रायपॉडला लावा. फ्रेम निवडण्यासाठी बर्स्ट मोड किंवा शॉट्सची मदत घ्या. झूम लेन्स किंवा क्लिप ऑन टेलिफोटो अटॅचमेंट फ्रेमची मदत घ्या. रिमोट शटर देखील रिलीज करू शकता. या टीप्समुळे तुम्हाला चंद्रग्रहणाचा प्रत्येक क्षण हा आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये कैद करता येईल.

चंद्रग्रहणाच्या काळात, देवदेवतांच्या मूर्तींची पूजा किंवा स्पर्श करणे टाळले जाते. या काळात खाणे किंवा झोपणे देखील  अनेक लोक टाळतात. भारतात ग्रहणाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. काही लोक थेट ग्रहणानंतर घरातील सर्व कपडे देखील धुतात. हे ग्रहण अभ्याच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. बरेच लोक धार्मिक गोष्टी या काळात करत नाहीत. तुम्ही देखील हे चंद्रग्रहण आरामात बघू शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.