Attracting positive energy in Pitru Paksha: पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक पवित्र काळ आहे, जो आपल्या पूर्वजांचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. असं मानलं जातं की या काळात पूर्वजांचा आदर केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनात शांती, सकारात्मकता आणि समृद्धी येते. पितृपक्षादरम्यान साध्या वास्तु तत्वांचे पालन केल्याने घरात सुसंवादी आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत वातावरण निर्माण होण्यास मदत होऊ शकते. यंदा पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
देवघरजास्तीत जास्त सकारात्मक उर्जेसाठी घरातील देवघर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून असले पाहिजे. पितृपक्षाच्या वेळी या दिशांना दिवा लावणे आणि फुले किंवा पूर्वजांच्या आठवणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानलं जातं. या दिशांना तुमचे पूजास्थान संरेखित केल्याने आध्यात्मिक ऊर्जा वाढण्यास आणि आशीर्वाद मिळविण्यास मदत होते.
घर स्वच्छ ठेवावेवास्तुनुसार पितृपक्षात घर स्वच्छ ठेवावे. यामुळे नकारात्मक उर्जा कमी होते. या काळात घरातील प्रत्येक कोपरा नीट ठेवावा. तसेच कुठेही कचरा जमा करून ठेऊ नका. नीटनेटके आणि व्यवस्थित घर मानसिक शांती आणि आध्यात्मिक साधनांसाठी शांत वातावरण निर्माण करते.
पाण्याचा योग्य ठिकाणी वापरपाणी योग्य ठिकाणी साठवून ठेवावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. पितृपक्षा दरम्यान पूर्वज घरी येतात. या गोष्टीमुळे सकारात्मक ऊर्जी घराकडे आकर्षित होते.
Pitru Paksha 2025: पितृपक्ष सुरू होताच, चुकूनही करू नका 'हे' 6 काम, पितृदोषापासून राहाल दूर दान करापितृपक्षात दान करण्याला खुप महत्व आहे. वास्तूनुसार दान केल्याने पितर आनंदी होतात. तसेच घरात सकारात्मकता राहते.
घरातून नको असलेल्या वस्तू काढून टाकाघरातील जुन्या, तुटलेल्या किंवा नकारात्मकता पसरवणाऱ्या गोष्टी घराबाहेर काढून टाका. पितृपक्षात असे केल्याने सकारात्मकता टिकून राहते. घरात उपयोगी पडतील अशाच गोष्टी ठेवा.
पितृपक्षात फक्त पूर्वजांनाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जात नसून यामुळे घरात एक धार्मिक वातावरण देखील तयार होते. घरात सकारात्मकता देखील येते.
पितृपक्षात घराची स्वच्छता का महत्त्वाची आहे?
घरातील अव्यवस्था आणि गलिच्छपणा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो, ज्यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यात अडथळा येऊ शकतो; स्वच्छता सकारात्मक ऊर्जा वाढवते.
पूर्वजांचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत?
वास्तुशास्त्रानुसार, पूर्वजांचे फोटो दक्षिण दिशेला लावावेत, कारण ही दिशा पूर्वजांशी संबंधित आहे आणि त्यांचा आशीर्वाद मिळण्यास मदत करते.
पितृपक्षात कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
तुटलेली भांडी, बंद पडलेली घड्याळे, खराब मूर्ती आणि जुन्या वस्तू घरात ठेवू नयेत, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पूर्वज नाराज होऊ शकतात.
पितृपक्षात कोणत्या वनस्पतींची पूजा शुभ आहे?
पिंपळ आणि बरगडाच्या झाडाची पूजा किंवा त्यांना जल अर्पण करणे शुभ मानले जाते, कारण यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि सुख-समृद्धी मिळते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.