छत्रपती संभाजीनगर : ‘नॅक’कडून ‘ए प्लस’ मानांकन मिळवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क अर्थात एनआयआरएफ रँकिंगमध्ये यंदा मोठी घसरण झाली आहे. प्राध्यापकांच्या निवृत्तीमुळे विद्यापीठाच्या संशोधन प्रकाशनांच्या संख्येत घट झाली, ज्याचा परिणाम एनआयआरआफ रँकिंगवर दिसून आला. तसेच प्लेसमेंटचा परिणामही रॅंकिग घसरण्यात झालेला आहे.
अनेक ज्येष्ठ प्राध्यापक सेवानिवृत्त झाले. तसेच विद्यार्थी-शिक्षक यांचे प्रमाण कमी झाले. त्याचप्रमाणे अनेक प्राध्यापक सेवानिवृत्त झाल्यामुळे संशोधनातील योगदानही कमी झाले. परिणामी, विद्यापीठ संशोधनात कमी पडले.
त्यामुळे विद्यापीठाचे रँकिंग घसरले. मात्र, गेल्या वर्षभरात अनेक सकारात्मक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. त्यामुळे यापुढील रॅंकिंगमध्ये निश्चितच सुधारणा होईल, त्यासाठी विद्यापीठ काटिबद्ध असल्याचेही गुणवत्ता हमी कक्षाने म्हटले आहे.
कोणत्याच रॅंकिंगमध्ये नाहीएनआयआरएफ रँकिंगच्या क्रमवारीत राज्य विद्यापीठाच्या रॅंकिंगमध्ये पहिल्या पन्नास क्रमवारीत विद्यापीठाला स्थान मिळाले नाही. तर, ५१ ते १०० दरम्यान विद्यापीठाचे नाव दिसत आहे. यापूर्वी विद्यापीठ पहिल्या पन्नासमध्ये स्थान मिळाले होते, रॅंकिंग ४७ होते. ओव्हर ऑल रँकिंगमध्ये विद्यापीठ पहिल्या २०० मध्ये दिसत नाही. एकूण विद्यापीठांच्या रॅंकिंगमध्ये विद्यापीठ १५१ ते २०० दरम्यान आहे. असे कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले.
Pune Traffic: पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कसा सुटणार? आयुक्तांनी सांगितला प्लॅन, दीड वर्षात मोठे बदल परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नया आव्हानांवर मात करण्यासाठी कुलगुरू सकारात्मक पावले उचलत आहेत. प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, विद्यापीठाचे विद्यार्थी-शिक्षक यांचे प्रमाण आणि संशोधन क्षेत्रातील योगदान निश्चित सुधारेल. तसेच संशोधनावर आणि एकूण सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे विद्यापीठाच्या गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांनी सांगितले.