Tarriff War : भारत दोन महिन्यांत अमेरिकेची माफी मागेल… डोनाल्ड ट्रम्पचा मंत्री बरळला
GH News September 06, 2025 11:11 AM

टॅरिफच्या मुद्यावरून भारतासोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान, अमेरिकेच्या एका भयानक विधानाने खळबळ उडाली आहे. टॅरिफबाबत अमेरिकेची सध्या कठोर भूमिका असूनही भारत अमेरिकेच्या दबावाखाली येईल असे भाकित अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी केलं आहे. भारत अमेरिकेला जास्त काळ दुर्लक्ष करू शकत नाही असा युक्तिवाद त्यांनी रशियासोबत भारताच्या वाढत्या तेल व्यापाराबद्दल बोलताना केला. ट्रम्पच्या या मंत्र्यांच्या विधानानंतर आता चांगलीच खळबळ माजली आहे.

जर भारताने आपला दृष्टिकोन बदलला नाही, तर अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर 50 टक्के मोठ्या प्रमाणात कर आकारला जाऊ शकतो असे लुटनिक म्हणाले. कॅनडाच्या पूर्वीच्या टॅरिफ वादाची वॉशिंग्टनशी तुलना करताना, लुटनिक म्हणाले की सूडाच्या कारवाईमुळे फक्त लहान अर्थव्यवस्थांनाच नुकसान होईल.

अमेरिकेशी करेल तडजोड

हे सर्व ढोंग आहे, कारण सर्वात मोठ्या ग्राहकाशी लढणे चांगले वाटते. पण शेवटी भारत अमेरिकेशी करार करेल असे ते म्हणाले. पुढील एक-दोन महिन्यांत भारत पुन्हा वाटाघाटीच्या टेबलावर येईल, एवढंच नव्हे तर भारत माफीही मागेल आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलणी करून तडजोड करण्याचाही भारत प्रयत्न करेल असा दावाही लुटनिक यांनी केला.

भारताला दिला कडक इशारा

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कोणत्या प्रकारचे संबंध ठेवायचे आहेत हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठरवायचे आहे. लुटनिक यांनी भारताला कडक इशारा दिला आणि अमेरिकेच्या ५० टक्के कर टाळण्यासाठी तीन अटी समोर ठेवल्या. भारताला अमेरिकेसोबत युती करायची की ब्रिक्सच्या माध्यमातून रशिया आणि चीनशी संबंध मजबूत करायचे यापैकी एक पर्याय निवडावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. .

अमेरिकेच्या भारतासमोर 3 अटी

अमेरिकेने भारतासमोर 3 अटी ठेवल्या आहेत.भारताला रशियन तेल खरेदी करणे थांबवावे लागेल आणि ब्रिक्सचा भाग व्हावे लागेल, असे लुटनिक म्हणाले. जर भारताला रशिया आणि चीनमधील पूल बनायचे असेल तर तो तसं करू शकतो! पण डॉलरने अमेरिकेला किंवा त्याच्या सर्वात मोठ्या ग्राहकाला पाठिंबा द्यावा, किंवा 50 टक्के कर भरावा. किती काळ टिकते ते पाहूया असे आव्हानही त्यांनी दिलं. “आम्ही जगाचे ग्राहक आहोत. ही $30 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आहे. शेवटी, ग्राहक नेहमीच बरोबर असतो” असे लुटनिक यांनी अमेरिकेच्या आर्थिक वर्चस्वावर भर देताना म्हटले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.