GST Slabs: जीएसटी बदलामुळे सर्वसामान्यांचा खिसा भरणार; दरवर्षी 42,380 रुपयांची बचत होणार, समजून घ्या गणित
esakal September 06, 2025 06:45 AM
  • नवीन GST 2.0 धोरणामुळे 4 स्लॅब कमी करून फक्त 5% आणि 18% स्लॅब ठेवले आहेत.

  • दैनंदिन वस्तू, कपडे, हवाई प्रवास, औषधे आणि रेस्टॉरंट बिलावर मोठी कर सवलत मिळणार आहे.

  • यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाला दरवर्षी अंदाजे 42,380 रुपयांची बचत होईल.

New GST Rates Updates: केंद्र सरकारने दिवाळीपूर्वीच सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. बजेटमध्ये इन्कम टॅक्समध्ये सूट दिल्यानंतर आता सरकारने जीएसटीच्या स्लॅबमध्ये मोठा बदल केला आहे. आतापर्यंत 5%, 12%, 18% आणि 28% असे चार वेगवेगळे जीएसटी स्लॅब होते. आता हे कमी करून फक्त दोन मुख्य स्लॅब – 5% आणि 18% – ठेवले आहेत. याशिवाय 40% चा एक विशेष स्लॅब ठरवण्यात आला आहे, ज्यात सिगारेट, गुटखा, तंबाखू, पान मसाला, महागडे दारूचे प्रकार आणि इतर सिन गुड्स व लग्जरी वस्तूंचा समावेश आहे.

सरकारच्या निर्णयामुळे दैनंदिन गरजांच्या वस्तूंवर मोठा दिलासा मिळणार आहे. उदाहरणार्थ, राजेश, एका खासगी कंपनीत काम करणारे कर्मचारी महिन्याला 80,000 रुपये कमावतात आणि त्यांचा संपूर्ण खर्च पगारातूनच भागवतात. ते घरभाड्यासाठी 10,000 रुपये देतात आणि किराण्यावर सुमारे 20,000 रुपये खर्च करतात.

आधी किराण्यावर 12% जीएसटी होता, पण आता तो 5% झाला आहे. यामुळे 100 रुपयांच्या खरेदीवर थेट 7 रुपयांची बचतहोईल. महिन्याला जवळपास 1,400 रुपये आणि वर्षभरात तब्बल 16,800 रुपयांची बचत होईल.

Sin Goods In GST: जीएसटी कमी झाला, पण या 'सिन गुड्स' कोणत्या आहेत? ज्या खरेदी करणे होणार महाग

रेस्टॉरंटमध्ये खाण्यापिण्याचे दरही कमी होतील. आधी 18% जीएसटी असलेल्या पदार्थांवर आता फक्त 5% जीएसटी लागेल. महिन्याला 5,000 रुपयांचा खर्च करत असल्यास थेट 650 रुपयांची बचत होईल आणि वर्षभरात जवळपास 7,800 रुपये वाचतील.

सिनेमा पाहणेही स्वस्त होणार आहे. 100 रुपयांपर्यंतच्या तिकिटांवर आता फक्त 5% जीएसटी लागेल. पॉपकॉर्नवरही कर कमी झाला आहे – आधी 12% होता तो आता 5% झाला आहे. महिन्याला 2,000 रुपयांचा खर्च असल्यास 140 रुपयांची बचत होईल आणि वर्षभरात 1,680 रुपये वाचतील.

Shivaji Maharaj Tax System: कसा होता शिवाजी महाराजांचा GST पॅटर्न? शिवकाळात अशी होती टॅक्स सिस्टीम

महत्त्वाचं म्हणजे 33 जीवनावश्यक औषधांवर जीएसटीशून्य करण्यात आला आहे, तर सामान्य औषधांवर 5% कर लागू राहील. या सर्व बदलांचा हिशोब केल्यास, मध्यमवर्गीय कुटुंबाला वर्षभरात जवळपास 42,380 रुपयांची थेट बचत होऊ शकते.

FAQs

1. नवीन GST स्लॅब काय आहेत?
-आता फक्त दोन मुख्य स्लॅब – 5% आणि 18%, तसेच 40% चा विशेष स्लॅब सिन गुड्ससाठी आहे.

2. कोणत्या वस्तूंवर कर कमी झाला आहे?
-किराणा, कपडे, रेस्टॉरंट बिल, हवाई प्रवास (इकोनॉमी क्लास), पॉपकॉर्न आणि काही औषधे यावर कर कमी झाला आहे.

3. बचत किती होऊ शकते?
-एका मध्यमवर्गीय कुटुंबाला दरवर्षी सुमारे ₹42,380 ची बचत होऊ शकते.

4. सिन गुड्समध्ये काय बदल झाला?
- सिगारेट, तंबाखू, पान मसाला यावर 40% GST लागेल, जो पूर्वी 28% + सेस होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.