अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल अनेक धक्कादायक विधाने करताना दिसत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकेकाळी त्यांचे अत्यंत जवळचे मित्र होते. मात्र, आता या मैत्रीमध्ये मोठी कटुता आली. नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री तुटल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीबद्दल भाष्य करत म्हटले होते की, आता ती मैत्री राहिली नाही. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठी पलटी मारल्याचे त्यांच्या विधानावरून स्पष्ट दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि आपल्या मैत्रीवर भाष्य करत ही मैत्री कधीही तुटू शकत नसल्याचे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारत आणि अमेरिकेतील संबंध खूप जास्त मजबूत आणि चांगले आहेत. सध्या असलेल्या तणावाच्या परिस्थितीमध्येही मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच चांगले मित्र राहू. ते एक जबरदस्त पंतप्रधान आहेत. ते खूप म्हणजे खूप ग्रेट व्यक्ती आहेत. परंतू, सध्या ते जे काही करत आहेत, ते मला कळत नाहीये आणि आवडतही नाहीये. मात्र, भारत आणि अमेरिकेतील संबंध खास आहेत.
पण मला वाटते की, अजिबातच चिंतेचा विषय नाही. कारण दोन देशांमध्ये कधीतरी अशा घटना घडतात. डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आले की, तुम्ही भारतासोबतचे संबंध सुधार करण्याची तयारी करत आहात का? यावर उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प हे आपले म्हणणे अगदी स्पष्टपणे मांडताना दिसले. डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संभाष बंद झाल्याचेही मागील काही दिवसांपासून सांगितले जात आहे.
टॅरिफच्या मुद्द्यामध्ये नरेंद्र मोदी यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल तीन ते चार वेळा फोन केला. मात्र, तो फोन नरेंद्र मोदी यांनी उचलला नसल्याचा दावा केला जात आहे. हेच नाही तर अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अनेक देश हे भारताच्याजवळ आली आणि भारताने काही महत्वाचे करार इतर देशांसोबत केली आहेत.