बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि ते टीव्ही विश्वातील एक मोठे नाव आहे. अन्नू कपूर यांनी नुकतेच टीव्ही9 भारतवर्षच्या खास कार्यक्रम सत्ता सम्मेलनात भाग घेतला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले आणि अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. एकीकडे त्यांनी आपल्या बालपणीच्या संघर्षाची आठवण काढली, तर दुसरीकडे त्यांनी राजकारणाशी संबंधित प्रश्नांमध्येही रस दाखवला. याशिवाय, अभिनेत्याला बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांच्या रागाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. अन्नू कपूर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
अन्नू यांनी जयाबद्दल काय सांगितले?
सत्ता सम्मेलनात अन्नू कपूर यांना जया बच्चन यांच्या रागाबद्दल प्रश्न विचारण्यात आला आणि त्यांना जया बच्चनच्या काही क्लिप्सही दाखवण्यात आल्या. यावर अन्नू कपूर यांनी विनोदी अंदाजात सांगितले की, “मला समजले, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीबद्दल बोलत आहात ते.” पुढे अन्नू यांनी जया बच्चन यांच्या बद्दल सांगितले, “मी असं काही पाहिलं नाही. तुम्ही जे दाखवत आहात, ते तुम्ही योग्य दाखवत असाल, ज्या अँगलमधून तुम्ही दाखवलं आहे. पण जया बच्चन माझी मोठी बहीण आहे आणि मी माझ्या मोठ्या बहिणीबद्दल काही बोलणार नाही.”
वाचा: मोठी बातमी! अभिनेत्रीच्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, मुंबईत रंगेहात पकडलं
चार सुपरस्टार्सपैकी कोण श्रेष्ठ?
यानंतर रॅपिड फायर राउंडमध्ये अन्नू कपूर यांना काही पर्यायी प्रश्न विचारले होते. त्यांना विचारण्यात आले की, कंगना रणौत आणि जया बच्चन यांच्यापैकी कोण उत्तम राजकारणी आहे. यावर अन्नू कपूर यांनी उत्तर दिले की, जया बच्चन त्यांची मोठी बहीण आहे आणि कंगना रणौत त्यांची छोटी बहीण आहे. यापेक्षा जास्त त्यांना काही माहिती नाही.
तसेच, त्यांना विचारण्यात आले की, दिलीप कुमार, राजेश खन्ना, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना उत्तम अभिनेत्याच्या दृष्टिकोनातून क्रमवारीत लावावे. यावेळी अन्नू कपूर यांनी अभिनयाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर दिलीप कुमार यांना ठेवले. दुसऱ्या क्रमांकावर अमिताभ बच्चन यांना ठेवले. तिसऱ्या क्रमांकावर अन्नू यांनी शाहरुख खान यांना ठेवले आणि चौथ्या क्रमांकासाठी त्यांनी राजेश खन्ना यांची निवड केली. अन्नू कपूर यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर अन्नू कपूर आता अरशद वारसी आणि अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी 3’ या चित्रपटात दिसणार आहेत.