भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गेल्या पाच वर्षांत आपला बँक बॅलन्स १४,६२७ कोटी रुपयांनी वाढवला आहे.
२०२४ मध्ये बीसीसीआयचा बँक बॅलन्स २०,६८६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
राज्य संघटनांचे देय चुकते केल्यानंतरही निधीत दुपटीने वाढ झाली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असल्याचे म्हटले जाते. क्रिकेट भारतात सर्वात लोकप्रिय खेळ असल्याने अमाप पैसा बीसीसीआयला मिळतो. त्यामुळे बीसीसीआयचा बँक बॅलन्सही मोठ्या प्रमाणात आहे.
गेल्या पाच वर्षातच बीसीसीआयने तब्बल १४,६२७ कोटी रुपयांनी आपली ताकद वाढवली आहे. गेल्यावर्षीच ४,१९३ कोटी रुपयांची वाढही झाली आहे. रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयचा बँक बॅलन्स आता २०, ६८६ कोटी रुपये आहे.
BCCI Sponsorship 2025 : नव्या प्रायोजकातून बीसीसीआय ४०० कोटींहून अधिक कमवणार? नेमका प्लॅन काय?क्रिकबझने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार सर्व राज्य संघटनांची देणी चुकती केल्यानंतरही बीसीसीआयच्या निधीत दुपटीने वाढ झाली आहे. २०१९ मध्ये ३,९०६ कोटी रुपये सर्वसाधारण निधी होता, तो आता २०२४ मध्ये ७,९८८ कोटी रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच ४,०८२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
बीसीसीआयच्या २०२४ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जो अहवाल सादर केला होता, त्यानुसार २०१९ पासून २०२४ पर्यंत बीसीसीआयचा बँक बॅलन्स ६,०५९ कोटी रुपयांवरून २०,६८६ कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. विशेष म्हणजे राज्य संघटनांचे देय पूर्ण केल्यानंतरची ही रक्कम आहे.
याचाच अर्थ गेल्या ५ वर्षांमध्ये बीसीसीआयच्या बँक बॅलन्समध्ये तब्बल १४,६२७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे, असे लक्षात येते.
याशिवाय रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की बीसीसीआयने कर दायित्वांसाठीही तरतूद केली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ३,१५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा विषय सध्या न्यायालयात प्रलंबित असला तरी संभाव्य दायित्वांची पूर्तता करण्यासाठी ही रक्कम राखून ठेवलेली आहे.
तथापि, बीसीसीआयचे मिडिया राईट्समधून मिळणारे उत्पन्न २,५२४.८० कोटींहून ८१३.१४ कोटींवर घसरले आहे. यामागे कारण असे की भारतीय संघाचे मायदेशातील सामन्यांची संख्या कमी होती. पण गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न ५३३.०५ कोटींहून ९८६.४५ कोटींपर्यंत पोहचले आहे.
तसेच आयपीएलचीकमाई आणि आयसीसीकडून मिळालेल्या वाट्यामुळे बीसीसीआयने २०२३-२४ या वर्षात १.६२३.०८ कोटी अधिशेष नोंदवला आहे, हा मागील वर्षापेक्षा ११६७.९९ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
बीसीसीआयने पायाभूत सुविधा विकासासाठी १२०० कोटी, प्लेटिनम जुबली फंडासाठी ३५० कोटी आणि क्रिकेट विकासासाठी ५०० कोटी रुपये निधीचे वाटप केले आहे. सर्व राज्य संघटनांना मिळून १९९०.१८ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. आत्ता चालू असलेल्या वर्षासाठी हे वितरण २ हजार कोटींच्या वर जाण्याचा अंदाज आहे.
ही आकडेवारी २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत औपचारिकरित्या सादर केली जाण्याची शक्यता आहे.
BCCI Update : नवे प्रायोजक, बीसीसीआय सावध; जुगार, ऑनलाइन गेमिंग, क्रिप्टो चलन क्षेत्रातील कंपन्यांवर बंदी FAQsप्र.१: बीसीसीआयचा बँक बॅलन्स २०२४ मध्ये किती आहे?
उ.१: बीसीसीआयचा बँक बॅलन्स २०,६८६ कोटी रुपये आहे.
(What is BCCI’s bank balance in 2024?)
प्र.२: बीसीसीआयने पाच वर्षांत किती वाढ केली आहे?
उ.२: पाच वर्षांत बीसीसीआयने तब्बल १४,६२७ कोटी रुपयांची वाढ केली आहे.
(How much has BCCI grown in the last five years?)
प्र.३: बीसीसीआयने करदायित्वांसाठी किती तरतूद केली आहे?
उ.३: २०२३-२४ मध्ये बीसीसीआयने ३,१५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
(How much has BCCI provisioned for tax liabilities in FY 2023-24?)
प्र.४: बीसीसीआयचा २०२३-२४ मधील अधिशेष किती आहे?
उ.४: बीसीसीआयचा अधिशेष १,६२३.०८ कोटी रुपये आहे.
(What is BCCI’s surplus for 2023-24?)
प्र.५: बीसीसीआयने कोणत्या कामांसाठी निधी वाटप केला आहे?
उ.५: पायाभूत सुविधा, प्लेटिनम जुबली फंड आणि क्रिकेट विकासासाठी निधी वाटप केला आहे.
(What allocations has BCCI made for 2023-24?)