Ganpati Visarjan 2025 : मुंबईमध्ये विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू
Saam TV September 08, 2025 01:45 AM
  • भाईंदर पश्चिम येथे विसर्जन मिरवणुकीत दुर्दैवी अपघात

  • विजेच्या धक्क्याने ३४ वर्षीय कार्यकर्ता प्रतीक शाह यांचा जागीच मृत्यू

  • मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी उत्सवात घडलेली घटना

  • पोलिसांकडून पंचनामा व पुढील तपास सुरू

मुंबईतील भाईंदरमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. भाईंदर पश्चिम येथील मोदी पटेल मार्गावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेत असताना कार्यकर्त्याला विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. प्रतीक शाह (वर्ष ३४) असे या तरुणाचे नाव आहे.

भाईंदर पश्चिम येथील मोदी पटेल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे पन्नासावे वर्ष असल्याने उत्सव मोठ्या उत्साहात आणि धामधुमीत साजरा करण्यात येत होता. मंडळाने परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. शनिवारी ६ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे पावणे आठ वाजता गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आली.

Lalbaug Visarjan 2025 : लालबागचा राजा ५ तासांपासून गिरगावच्या चौपाटीवर, विसर्जनाला उशीर का? समोर आलं कारण

मिरवणुकीदरम्यान मोदी पटेल रस्त्याच्या नाक्यावर झाडावर बांधलेल्या विद्युत तारेला हात लागल्याने प्रतीक शाह यांना जबर शॉक लागला. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या कार्यकर्त्यासही शॉक बसला, मात्र इतरांनी प्रसंगावधान राखून त्याला बाजूला केले.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

प्रतीक शाह यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. भाईंदर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान गणपती विसर्जन मिरवणुकीत घडलेल्या या घटनेनंतर प्रतीक शाहच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरातही शोककळा पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.