आताच तिकिट बुक करा! दिवाळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर
Saam TV September 08, 2025 04:45 AM
  • दिवाळी, दसरा, छठसाठी मध्य रेल्वेने ९४४ विशेष गाड्या जाहीर केल्या

  • मुंबई, पुणे, नागपूर, लातूर, कोल्हापूरसह अनेक स्थानकांवरून सेवा सुरू

  • प्रवाशांच्या सोयीसाठी तिकिट बुकिंग IRCTC व रेल्वे काउंटरवर सुरू होणार आहे.

  • दिवाळीच्या काळात गर्दी कमी होऊन तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे.

दिवाळीमध्ये सुट्टीला गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. एसटी बस, रेल्वेंमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यामुळे बसायलाही जागा राहात नाही. परिणामी खासगी वाहनांने जास्त रक्कम देत प्रवास करावा लागतो. अव्वाच्या सव्वा खर्च होतो, पण आरामदायी प्रवास होत नाही. पण रेल्वेकडून यावर तोडगा काढण्यात आला आहे. दिवळीमधील गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तब्बल ९४४ रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे कोणत्या रूटने जाणार, कोणत्या स्थानकावर थांबणार, कधी धावणार.. याबाबतची सर्व माहिती जाणून घेणार आहोत...

भारतीय रेल्वेने दिवाळीआधीच प्रवाशांना मोठं गिफ्ट दिले आहे. मध्य रेल्नेवे पूजा, दसरा, दिवाळी आणि छठ या सणादरम्यान तब्बल ९४४ उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना या रेल्वेचा विशेष फायदा होणार आहे. पुणे, कोल्हापूर मुंबईसह विविध स्थानकातून उत्सव हंगामात मध्य रेल्वेने विविध ठिकाणांवरून विशेष गाड्या धावणार आहेत. त्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पुणे – हजरत निजामुद्दीन – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (२० सेवा)

01491 पुणे – हजरत निजामुद्दीन साप्ताहिक सुपरफास्ट विशेष सेवा २६.०९.२०२५ ते २८.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शुक्रवारी पुणे येथून १७.३० वाजता सुटेल (१० सेवा) आणि हजरत निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी २०.०० वाजता पोहोचेल.

01492 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष सेवा २७.०९.२०२५ ते २९.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शनिवारी हजरत निजामुद्दीन येथून २१.२५ वाजता सुटेल (१० सेवा) आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल.

थांबे: लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, उधना, सूरत, वडोदरा जं., गोधरा (फक्त 01492 करीता), रतलाम, शामगढ़, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपुर, गंगापूर सिटी, भरतपूर जं., मथुरा.

कोल्हापूर – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर साप्ताहिक विशेष (२० सेवा)

01418 कोल्हापूर – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष सेवा २४.०९.२०२५ ते २६.११.२०२५ पर्यंत प्रत्येक बुधवारी कोल्हापूर येथून २२.०० वाजता सुटेल (१० सेवा) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल.

01417 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– कोल्हापूर साप्ताहिक विशेष सेवा २५.०९.२०२५ ते २७.११.२०२५ पर्यंत प्रत्येक गुरुवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १४.३० वाजता सुटेल (१० सेवा) आणि कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी ०४.२० वाजता पोहोचेल.

थांबे: मिरज, सांगली, किर्लोस्कर वाडी, कराड, सातारा, लोणंद, जेजुरी, पुणे, लोणावळा, कल्याण.

लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नॉर्थ – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (२० सेवा)

ट्रेन क्र. 01463 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नॉर्थ साप्ताहिक विशेष सेवा २५.०९.२०२५ ते २७.११.२०२५ पर्यंत प्रत्येक गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.०० वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम नॉर्थ येथे दुसऱ्या दिवशी २०.४५ वाजता पोहोचेल. (१० सेवा)

ट्रेन क्र. 01464 तिरुवनंतपुरम नॉर्थ – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष सेवा २७.०९.२०२५ ते २९.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शनिवारी तिरुवनंतपुरम नॉर्थ येथून १६.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २१.५० वाजता पोहोचेल. (१० सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सवंतवाडी रोड, मडगाव, कारवार, कुमटा, कुंदापुर, उडीपी, मंगलोर, कासरगोड, कान्नूर, कालिकट, तिरूर, शोरानूर, त्रिचूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कयंकुलम जंक्शन आणि कोल्लम.

पुणे – सांगानेर जंक्शन – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (२० सेवा)

01433 पुणे – सांगानेर जंक्शन साप्ताहिक विशेष सेवा २४.०९.२०२५ ते २६.११.२०२५ पर्यंत प्रत्येक बुधवारी पुणे येथून ०९.४५ वाजता सुटेल (१० सेवा) आणि सांगानेर जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी ०५.४० वाजता पोहोचेल.

01434 सांगानेर जंक्शन – पुणे साप्ताहिक विशेष सेवा २५.०९.२०२५ ते २७.११.२०२५ पर्यंत प्रत्येक गुरुवारी सांगानेर जंक्शन येथून ११.३५ वाजता सुटेल (१० सेवा) आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०९.३० वाजता पोहोचेल.

थांबे: लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सूरत, अंकलेश्वर जंक्शन, वडोदरा, रतलाम, रामगंज मंडी, कोट आणि सवाई माधोपुर.

लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (८ सेवा)

01179 लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष सेवा १७.१०.२०२५ ते ०७.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८.२० वाजता सुटेल (४ सेवा) आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी २१.०० वाजता पोहोचेल.

01180 सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष ट्रेन १७.१०.२०२५ ते ०७.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शुक्रवारी सावंतवाडी रोड येथून २२.२० वाजता सुटेल (४ सेवा) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १०.४० वाजता पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ.

लातूर – हडपसर – लातूर विशेष (७४ सेवा)

01429 लातूर – हडपसर विशेष सेवा २६.०९.२०२५ ते २८.११.२०२५ पर्यंत प्रत्येक सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी लातूर येथून ०९.३० वाजता सुटेल आणि हडपसर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. (३७ सेवा)

01430 हडपसर – लातूर विशेष सेवा २६.०९.२०२५ ते २८.११.२०२५ पर्यंत प्रत्येक सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी हडपसर येथून १६.०५ वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी २१.२० वाजता पोहोचेल. (३७ सेवा)

थांबे: हरंगुळ, मुरूड, धाराशिव, बारसी टाउन, कूर्डूवाडी, जेऊर आणि दौंड.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– गोरखपूर – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (१३२ सेवा)

01079 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – गोरखपूर विशेष सेवा २६.०९.२०२५ ते ३०.११.२०२५ पर्यंत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २२.३० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी १०.०० वाजता पोहोचेल. (६६ सेवा)

01080 गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष सेवा २८.०९.२०२५ ते ०२.१२.२०२५ पर्यंत गोरखपूर येथून दररोज १४.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. (६६ सेवा)

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद.

पुणे – गोरखपूर – पुणे विशेष (१३० सेवा)

01415 पुणे – गोरखपूर विशेष सेवा २७.०९.२०२५ ते ३०.११.२०२५ पर्यंत दररोज पुणे येथून ०६.५० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी १६.०० वाजता पोहोचेल. (६५ सेवा)

01416 गोरखपूर – पुणे विशेष सेवा २८.०९.२०२५ ते ०१.१२.२०२५ पर्यंत दररोज गोरखपूर येथून १७.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी ०३.१५ वाजता पोहोचेल. (६५ सेवा)

थांबे: दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती.

दौंड – कलबुरगि – दौंड अनारक्षित विशेष – आठवड्यात ५ दिवस (९६ सेवा)

01421 अनारक्षित विशेष सेवा २६.०९.२०२५ ते ०१.१२.२०२५ पर्यंत प्रत्येक सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी दौंड येथून ०५.०० वाजता सुटेल आणि कलबुरगि येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल. (४८ सेवा)

01422 अनारक्षित विशेष सेवा २६.०९.२०२५ ते ०१.१२.२०२५ पर्यंत प्रत्येक सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी कलबुरगि येथून १६.१० वाजता सुटेल आणि दौंड येथे त्याच दिवशी २२.२० वाजता पोहोचेल. (४८ सेवा)

थांबे: भिगवण, परेवाडी, जेऊर, केम, कूर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टीकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गाणगापूर.

दौंड – कलबुरगि – दौंड अनारक्षित द्वि-साप्ताहिक विशेष (४० सेवा)

01425 अनारक्षित विशेष सेवा २५.०९.२०२५ ते ३०.११.२०२५ पर्यंत प्रत्येक गुरुवार आणि रविवारी दौंड येथून ०५.०० वाजता सुटेल आणि कलबुरगि येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल. (२० सेवा)

01426 अनारक्षित विशेष सेवा २५.०९.२०२५ ते ३०.११.२०२५ पर्यंत प्रत्येक गुरुवार आणि रविवारी कलबुरगि येथून २०.३० वाजता सुटेल आणि दौंड येथे दुसऱ्या दिवशी ०२.३० वाजता पोहोचेल. (२० सेवा)

थांबे: भिगवण, परेवाडी, जेऊर, केम, कूर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टीकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गाणगापूर.

नागपूर – पुणे – नागपूर साप्ताहिक विशेष (२० सेवा)

01209 विशेष सेवा २७.०९.२०२५ ते २९.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल. (१० सेवा)

01210 विशेष सेवा २८.०९.२०२५ ते ३०.११.२०२५ पर्यंत प्रत्येक रविवारी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. (१० सेवा)

थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

नागपूर – समस्तीपूर – नागपूर साप्ताहिक विशेष (२० सेवा)

01207 साप्ताहिक विशेष सेवा २४.०९.२०२५ ते २६.११.२०२५ पर्यंत प्रत्येक बुधवारी नागपूर येथून १०.४० वाजता सुटेल आणि समस्तीपूर येथे दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता पोहोचेल. (१० सेवा)

01208 साप्ताहिक विशेष सेवा २५.०९.२०२५ ते २७.११.२०२५ पर्यंत प्रत्येक गुरुवारी समस्तीपूर येथून २३.४५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे तिसऱ्या दिवशी ०७.०० वाजता पोहोचेल. (१० सेवा)

थांबे: बेतूल, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, गोंडा, बस्ती, गोरखपूर, छपरा, हाजीपुर आणि मुजफ्फरपूर.

पुणे – हजरत निजामुद्दीन – पुणे द्विसाप्ताहिक विशेष (३६ सेवा)

01483 द्विसाप्ताहिक विशेष ३०.०९.२०२५ ते २९.११.२०२५ पर्यंत प्रत्येक मंगळवारी व शनिवारी पुणे येथून १७.३० वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी २०.०० वाजता पोहोचेल. (१८ सेवा)

01484 द्विसाप्ताहिक विशेष ०१.१०.२०२५ ते ३०.११.२०२५ पर्यंत प्रत्येक बुधवार व रविवारी हजरत निजामुद्दीन येथून २१.२५ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता ोहोचेल. (१८ सेवा)

थांबे: लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, उधना, वडोदरा जं., रतलाम, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपुर, गंगापूर सिटी, भरतपूर जं. आणि मथुरा.

लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) – दानापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक विशेष ट्रेन (१३४ सेवा)

01143 दैनिक विशेष २५.०९.२०२५ ते ३०.११.२०२५ पर्यंत दररोज लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथून १०.३० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल. (६७ सेवा)

01144 दैनिक विशेष २६.०९.२०२५ ते ०१.१२.२०२५ पर्यंत दररोज दानापूर येथून २१.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथे तिसऱ्या दिवशी ०४.५० वाजता पोहोचेल. (६७ सेवा)

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर आणि आरा.

लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (२० सेवा)

02139 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष २५.०९.२०२५ ते २७.११.२०२५ पर्यंत प्रत्येक गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथून ००.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. (१० सेवा)

02140 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष २६.०९.२०२५ ते २८.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शुक्रवारी नागपूर येथून १३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल. (१० सेवा)

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

पुणे – दानापूर – पुणे विशेष (१३४ सेवा)

01449 विशेष गाडी २५.०९.२०२५ ते ३०.११.२०२५ पर्यंत दररोज पुणे येथून १५.३० वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसऱ्या दिवशी ०२.०० वाजता पोहोचेल.

01450 विशेष गाडी २७.०९.२०२५ ते ०२.१२.२०२५ पर्यंत दररोज दानापूर येथून ०५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.१५ वाजता पोहोचेल.

थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर आणि आरा.

लोकमान्य टिळक टर्मिनस – लातूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (२० सेवा)

01007 साप्ताहिक विशेष गाडी २८.०९.२०२५ ते ३०.११.२०२५ पर्यंत प्रत्येक रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ००.५५ वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. (१० सेवा)

01008 साप्ताहिक विशेष गाडी २८.०९.२०२५ ते ३०.११.२०२५ पर्यंत प्रत्येक रविवारी लातूर येथून १६.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.५० वाजता पोहोचेल. (१० सेवा)

थांबे: ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी आणि धाराशिव.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.