Viral Video: मगर-अजगर आमनेसामने! दोघांमध्ये जोरदार जुंफली, कोण जिंकलं कोण हरलं पाहा; थक्क करणारा व्हिडीओ
Tv9 Marathi September 08, 2025 01:45 AM

सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे सतत व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. कधी दोन प्राण्यांमध्ये शिकारवरून चांगलेच भांडण होते. तर कधी ते एकमेकांवर हल्ला करताना दिसतात. जंगलाची दुनिया नेहमीच रोमांचाने भरलेली असते. कधी सिंह एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतो, तर कधी मगर पाणी पिण्यासाठी गेलेल्या प्राण्याला आपला बळी बनवतो. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना धडकी भरली आहे. या व्हिडीओमध्ये नदीकिनारी मगर आणि अजगर आमनेसामने आले आहेत. आता या भांडणात नेमकं कोण जिंकतं चला जाणून घेऊया…

काय आहे व्हिडीओ?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नदीकिनारी एक मोठा अजगर दगडाखाली अडकलेला आहे. त्याच ठिकाणी मगर देखील दबा धरून बसलेली आहे. अजगर जेव्हा मगरीच्या जवळ येतो, तेव्हा मगर संतापते आणि त्याला चावा घेण्याचा प्रयत्न करते. पण अजगर कसाबसा तिथून पळ काढतो. मात्र, पुढच्याच क्षणी अजगराने मगरीला जखडल्याचे दिसते. कदाचित अजगर नंतर बदला घेण्यासाठी परत आला असेल आणि त्याने मगरीलाच पकडले. व्हिडीओ पाहून असे वाटते की मगरीची हार निश्चित आहे.

वाचा: मगरींनी घेरलं, पण ‘आकाशाच्या राजा’ने वाचवले! सिंहाच्या बछड्याचा खतरनाक व्हिडीओ

pic.twitter.com/f6jCnh0YxW

— Wildlife Uncensored (@TheeDarkCircle)

अंगावर काटे आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर @TheeDarkCircle या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 13 सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. तर शेकडो लोकांनी याला लाइक केले आहे आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

एकाने यूजर लिहिले आहे, ‘हा तर हॉलिवूड चित्रपटापेक्षा जास्त रोमांचक आहे’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे, ‘नॅशनल जिओग्राफिकचे दृश्य मोफत मिळाले’. एकाने लिहिले आहे, ‘येथे तर जंगलातील खऱ्या बॉसचा पत्ता लागला’. मगर आणि अजगर यांच्यातील ही लढाई केवळ रोमांचकच नव्हती, तर याने सोशल मीडियावर लाखो लोकांना चकित केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.