भूम : भूम तालुक्यातील सुकटा शिवारात पवनचक्की कंपनीकडून अवैध (मुरुम ) उत्खनन चालू असताना माजी सरपंच बजरंग गोयेकर हे त्या ठिकाणी गेले असता त्यांना फोटो का काढले म्हणत पवनचक्की माफी यांनी सांभाळलेल्या गावगुंडांनी बेदम मारहाण केली आहे .त्यां च्यावर बार्शी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत .
तालुक्यातील सुकटा शिवारात पवनचक्की कंपनीचे कामे चालू आहेत . अवैध (मुरूम )उत्खनन चालू असताना माजी सरपंच गोयकर त्या ठिकाणी गेले असता त्यांना पवनचक्की कर्मचाऱ्यांनी फोटो का काढले असे विचारत मारहाण केली.
व नंतर पाच गाव गुंडांना बोलावून घेत( ता .५ ) रोजी दुपारी ३ : ३० .वाजण्याच्या सुमारास भूम कडे येत असताना रस्त्यात अडवून मारवाड आणि स्टम्पने इतर साहित्याने बेदम मारहाण केली .गोईकर यांना बार्शी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे .त्यांची तब्येत ठीक आहे .
भूम पोलीस निरीक्षक ,बीट आमलदार यांनी बार्शी येथे गोवेकर यांची भेट घेतली आहे .परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही .बजरंग गोयकर हे सातत्याने पवनचक्की कंपनी व पवनचक्की माफिया विरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत .परंतु पवनचक्की माफीयांनी याच करणारे त्यांना टार्गेट करत बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे गोयकर यांनी बोलताना सांगितले .
Satara Crime: वृद्धेच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप; वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खूनभूम वाशी तालुक्यामध्ये पवनचक्की माफिया कडून वारंवार शेतकऱ्यावर व माजी सरपंचावर मारहाणीचे प्रकार घडत आहेत .मात्र या पवनचक्की माफियावर पोलीस प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे .पुढील काळात अशा घटना घडत गेल्यास बीडचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाप्रमाणे पुनरावृत्ती होऊ शकते याची पोलीस प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे .व भूम वाशी तालुक्यामध्ये घडत असलेल्या घटना घडू नये .पवनचक्की माफियावर कडक कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गांमधून होत आहे .