‘कालिदास’च्या
प्र. कुलगुरुपदी डॉ. वैद्य
रत्नागिरी, ता. ७ : लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे (नागपूरचे) कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांची रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या प्रभारी कुलगुरुपदी निुयक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा आदेश राजभवनाकडून जारी करण्यात आला. डॉ. वैद्य हे निरीचे संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. कालिदास विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी येथील भारतरत्न डॉ. पां. वा. काणे रत्नागिरी संस्कृत अध्ययन उपकेंद्रातर्फेही डॉ. वैद्य यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. वैद्य यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) येथून पीएच्. डी. प्राप्त केली आहे. त्यांना ३४ वर्षांचा संशोधन अनुभव असून, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन अशा विषयांमध्ये त्यांनी संशोधन केले आहे. अध्यापन, संशोधन आणि प्रशासन या तीनही आघाड्यांवर त्यांचे कर्तृत्व प्रख्यात आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण क्षेत्रासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.