'माझी तुझी रेशीमगाठ 2 ?' श्रेयस- प्रार्थना यांनी एकत्र घेतलं स्वामींचं दर्शन; एकत्र बघून प्रेक्षकांमध्ये चर्चा
esakal September 08, 2025 07:45 AM
  • माझी तुझी रेशीमगाठ (2021–2023) ही झी मराठीवरील मालिका श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे आणि मायरा वायकुळ यांच्या अभिनयामुळे प्रचंड गाजली आणि टीआरपीत नंबर 1वर होती.

  • मालिकेचा सिक्वेल यावा अशी प्रेक्षकांची मागणी बराच काळ होत आहे.

  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे आणि दिग्दर्शक अजय मयेकर हे श्री स्वामी समर्थांच्या मठातून स्क्रिप्टसदृश कागदाचा गठ्ठा घेऊन बाहेर पडताना दिसले, त्यामुळे सिक्वेलच्या चर्चेला उधाण आले आहे.

  • Marathi Entertainment News : झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका खूप गाजली. या मालिकेतून श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. बालकलाकार मायरा वायकुळचीही मुख्य भूमिका होती. 2021ते 2023 काळात ही मालिका झी मराठीवर प्रसारित झाली. टीआरपीमध्ये त्यावेळी नंबर 1 असलेल्या या मालिकेला खूप लोकप्रियता मिळाली.

    या मालिकेचा सिक्वेल यावा अशी प्रेक्षकांची इच्छा होती. पण तुम्हाला माहितीये का ? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ गाजतोय. या व्हिडिओमध्ये माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील गाजलेलं त्रिकुट म्हणजे प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे आणि माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर हे त्रिकुट एकत्र श्री स्वामी समर्थांच्या मठातून बाहेर पडताना दिसले. त्यावेळी त्यांच्या हातात एक कागदाचा गठ्ठा होता. यावरून ते एखादी स्क्रिप्ट स्वामींच्या पायाशी ठेवण्यात आली होते अशी चर्चा रंगली आहे.

    View this post on Instagram

    A post shared by मराठी मनोरंजन विश्व (@marathimanoranjanvishwa)

    यावरून श्रेयस, प्रार्थना पुन्हा एकदा एका नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आता त्यांचा हा आगामी प्रोजेक्ट काय असणार ? मालिकेचा सिक्वेल आहे की इतर प्रोजेक्ट आहे हे अजून उघड झालं नाहीये.

    श्रेयस प्रार्थनाच्या या नवीन प्रोजेक्टसाठी प्रेक्षक मात्र उत्सुक आहेत. लवकरच याबाबत नवीन अपडेट शेअर केला जाईल अशी चर्चा आहे.

    FAQs :

    1. माझी तुझी रेशीमगाठ मालिका कधी प्रसारित झाली होती?
    2021 ते 2023 दरम्यान झी मराठीवर.

    2. या मालिकेतील मुख्य कलाकार कोण होते?
    श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे आणि बालकलाकार मायरा वायकुळ.

    3. मालिकेला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळाला?
    ही मालिका अत्यंत लोकप्रिय ठरली आणि टीआरपीत नंबर 1वर होती.

    4. सध्या कोणत्या कारणामुळे मालिकेची चर्चा होतेय?
    सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे, ज्यात प्रमुख कलाकार आणि दिग्दर्शक एका मठात स्क्रिप्ट घेऊन दिसले.

    5. या व्हिडिओमुळे काय अटकळ बांधली जातेय?
    की माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा सिक्वेल सुरू होऊ शकतो.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.