पराग ढोबळे
नागपूर : सण उत्सवाचे दिवस सुरु आहेत. यातच गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद असल्याने पोलीस प्रशासनाकडून या काळात दारूबंदीचे आदेश काढले होते. असे असताना देखील एकाने दारू विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात साठा आणला होता. पोलिसांना सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधिताला अटक करत अवैध दारूसाठा जप्त करण्याची कारवाई केली आहे.
नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे. यात रूपसिंग जितसिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान ईद ए मिलाद उन्नबी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दारूबंदी अर्थात या काळात दारू विक्रीस मनाई करण्यात आली होती. असे असतानाही आरोपीने विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात साठा आणला होता. याच पार्श्वभूमीवर रूपसिंगवर पाचपावली पोलिसांनी कारवाई केली.
Jalna : आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे स्वतःची बुवाबाजी चालवतात; अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांची जोरदार टीकापेट्रोलिंग करताना टाकला छापा
पाचपावली पोलीसांना या प्रकरणी माहिती मिळाली होती. यानंतर स्टेशनचे पोलीस पेट्रोलिंगवर असतांना छापा टाकण्यात आला. यावेळी रुपसिंग यांच्याकडे देशी, इंग्रजी तसेच मोहफुलीची दारू असा एक लाख तीस हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे या आरोपीने आपल्या घरातील बेड, कुलर आणि विविध ठिकाणी लपवून ठेवलेला माल पोलिसांनी शोधून जप्त केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पाच सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए
यवतमाळ : आगामी सण उत्सव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये, शांतता व सुवस्था कायम राहावी म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील पाच सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच आरोपींना अटक करून त्यांची नागपूर, अकोला व वाशिम येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हा पोलिस दल अॅक्शन मोडवर आल्याची चर्चा सुरू आहे.