Chandra Grahan 2025 : आज चंद्रग्रहण..! तुमच्या फोनवर पाहा एका क्लिकवर
esakal September 08, 2025 03:45 AM

आज ७ सप्टेंबरला रात्री आकाशात एक खगोलीय चमत्कार पाहायला मिळणार आहे. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण, ज्याला ‘ब्लड मून’ म्हणूनही ओळखले जाते भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये दिसणार आहे. ही खगोलीय घटना तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल फोनवरही अनुभवू शकता. चंद्राचा लाल रंग आणि त्याची रहस्यमयी छटा तुम्हाला थक्क करेल

कधी आणि कसे पाहाल चंद्रग्रहण?
हे चंद्रग्रहण रात्री ९:५७ वाजता सुरू होईल आणि रात्री ११ वाजता चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत झाकला जाईल. हा नजारा सुमारे ८२ मिनिटे दिसेल. पहाटे १:२७ वाजता ग्रहण संपेल. भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, युरोप, हिंद महासागर आणि अंटार्क्टिकामध्येही हा सोहळा पाहता येईल. उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहणे डोळ्यांना हानिकारक ठरू शकते. त्यामुळे नासाच्या अधिकृत वेबसाइटवर (https://science.nasa.gov/eclipses/) किंवा ‘Time and Date’ युट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपणाचा आनंद घ्या.

Elephant Video : हाथी राजा किधर चले! हत्तीच्या गोंडस पिल्लूने जिंकली लाखो मने, क्यूट व्हिडिओ व्हायरल

‘ब्लड मून’ म्हणजे काय?
जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका रेषेत येतात, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्र लाल रंगाचा दिसतो. यालाच ‘ब्लड मून’ म्हणतात. सूर्याच्या किरणांमधील लाल रंगच चंद्रावर पडतो ज्यामुळे हा अनोखा रंग दिसतो.

पुढचे चंद्रग्रहण कधी?
नासाच्या माहितीनुसार पुढील चंद्रग्रहण ३ मार्च २०२६ रोजी होईल. हेही पूर्ण चंद्रग्रहण असेल आणि पूर्व आशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह अनेक ठिकाणी दिसेल.

मार्केटमध्ये झाली गेमचेंजर मोबाईलची एन्ट्री; Realme Neo 7 Turbo AI झाला लाँच, दमदार फीचर्स अन् किंमत फक्त... FAQs
  • When is the lunar eclipse happening in 2025?
    चंद्रग्रहण २०२५ कधी होईल?

    चंद्रग्रहण ७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९:५७ वाजता सुरू होईल आणि पहाटे १:२७ वाजता संपेल.

  • Where can I watch the lunar eclipse 2025?
    चंद्रग्रहण २०२५ कुठे पाहू शकतो?

    चंद्रग्रहण नासाच्या वेबसाइट (https://science.nasa.gov/eclipses/) किंवा YouTube चॅनेलवर थेट पाहता येईल.

  • What is a blood moon?
    ब्लड मून म्हणजे काय?

    पूर्ण चंद्रग्रहणाला ब्लड मून म्हणतात, जेव्हा चंद्र लाल रंगाचा दिसतो कारण सूर्याची किरणे गाळली जातात.

  • Is it safe to watch the lunar eclipse with naked eyes?
    चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे सुरक्षित आहे का?

    चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे डोळ्यांना हानी पोहोचवू शकते, त्यामुळे ऑनलाइन पाहणे सुरक्षित आहे.

  • When is the next lunar eclipse after September 2025?
    सप्टेंबर २०२५ नंतर पुढील चंद्रग्रहण कधी होईल?

    पुढील चंद्रग्रहण ३ मार्च २०२६ रोजी होईल, जे पूर्ण चंद्रग्रहण असेल.

  • © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.