आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचांदीचे दर किती? 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील ?
Marathi September 08, 2025 06:25 PM

आज सोन्याचे दर: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीने टोक गाठल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेचा टॅरिफ, जागतिक अनिश्चितता अशा अनेक कारणांमुळे सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाला . गेल्या आठवड्यात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले असून सोन्याच्या दराने नवे उच्चांक गाठले आहेत . 1 जानेवारीला 79 हजार 677 रुपयांवर तोळ्यामागे असणारे सोनं  आज 1 लाख 26 हजार 179 रुपये झालं आहे .

मल्टी कमोडिटी एक्सचेंजप्रमाणे देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर वाढले आहेत . इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर जाहीर होणारे आजचे दर किती ? सोन्या चांदीच्या किमतीत किती फरक पडलाय ? आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे ? पाहूया ..

सोन्या चांदीचा आजचा भाव

24 कॅरेट सोन्याच्या किमती सध्या प्रचंड वाढलेल्या आहेत .आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याची किंमत काहीशी घसरली . 8 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याला दहा ग्रॅम मागे 1 लाख 08 हजार 180 रुपये मोजावे लागत आहेत . तर एका तोळ्यासाठी 24 कॅरेट सोन्याला एक लाख 26 हजार 179 रुपये द्यावे लागतील . 22 कॅरेट सोन्याला दहा ग्रॅम मागे 99 हजार 165 एवढा दर आज मोजावा लागत आहे . 20 कॅरेट सोना प्रतिदहा ग्राम 90 हजार 150 रुपये तर 18 कॅरेट सोन्यासाठी 81 हजार 135 रुपये खरेदीदारांना मोजावे लागतील .इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर जाहीर होणारे सोन्याचे दर देशभर सारखे असतात .मात्र ज्या शहरात सोने खरेदी करत असाल तिथे सोन्यावर 3 टक्के जीएसटी द्यावा लागेल .याशिवाय ज्वेलर्सकडून घडणावळीचे पैसेही घेतले जातात .त्यामुळे सोन्याचे दर वाढतात .

चांदीचे दर किती ?

सोन्याच्या दरासह चांदीच्या दरात देखील गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे .5 सप्टेंबरला चांदीच्या दरात 374 रुपयांची वाढ झाली .त्यामुळे एका किलोमागे चांदीचा दर एक लाख 23 हजार 581 रुपयावर पोहोचला . सराफा बाजारात जीएसटी सह एक किलो चांदीचा दर हा 1 लाख 27 हजार 288 रुपये एवढा आहे . आज 8 सप्टेंबर रोजी चांदीच्या किमतींमध्ये घसरण झाली असून एक लाख 24 हजार 700 रुपये प्रति किलोवर चांदी गेली आहे .

आठवड्याभरात सोन्याच्या किमती कितीने वाढल्या ?
इंडियन बुलियन मार्केट असोसिएशनच्या माहितीनुसार,  7 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 1 लाख 7 हजार 940 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा होता . जो आज (8 सप्टेंबर ) 1 लाख 08 हजार 180 रुपये झाला आहे . 240 रुपयांची आज वाढ आहे . एक सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 1 लाख 4 हजार 950 रुपये द्यावे लागत होते .

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.