भारताने या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात थायलंडवर 11-0 ने धुव्वा उडवत विजयी सलामी दिली होती. त्यानंतर भारताने जपान विरूद्धचा सामना 2-2 ने बरोबरीत सोडवला. वूमन्स टीम इंडिया आता सुपर 4 मध्ये खेळणार आहे. भारतासमोर या सामन्यात ए ग्रुपमधील दुसऱ्या स्थानी असणाऱ्या संघाचं आव्हान असणार आहे. (Photo Credit : X/Hockey India)
भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवून देण्यात दोघींनी निर्णायक भूमिका बजावली. नवनीत कौर आणि मुमताज खान या दोघींनी प्रत्येकी 3-3 गोल केले. विशेष म्हणजे या दोघींनी गोल करण्याची हॅटट्रिक केली. नवनीतने 14 व्या, 18 व्या आणि 28 व्या मिनिटाला गोल केला. तर मुमताज खान हीने दुसऱ्या, 32 व्या आणि 38 व्या मिनिटाला गोल केला. (Photo Credit : X/Hockey India)
वूमन्स आशिया कप स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले. या संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं. दोन्ही गटातील 2 अव्वल संघ सुपर 4 फेरीत पोहचतील. सुपर 4 मधील 2 अव्वल संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. आशिया कप जिंकणारा संघ बेल्जियम-नेदरलँडमध्ये होणाऱ्या एफआयएच वूमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरेल. त्यामुळे अंतिम सामन्यात दोन्ही संघांत चुरस पाहायला मिळणार आहे. (Photo Credit : X/Hockey India)
हॉकी आशिया कप स्पर्धेत मेन्स आणि वूमन्स या दोन्ही संघांनी धमाका केला आहे. मेन्स टीम इंडियाने हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात तब्बल 8 वर्षांनी नाव कोरलं. भारताने गतविजेत्या कोरियावर मात करत आशिया कप जिंकण्याची प्रतिक्षा संपवली. त्यानंतर वूमन्स हॉकी टीम इंडियाने विजयी झंझावात यशस्वीरित्या सुरु ठेवला आहे. वूमन्स टीम इंडियाने सिंगापूरवर एकतर्फी विजय मिळवला. भारताने सिंगापूरवर 12-0 अशा फरकाने विजय मिळवला. (Photo Credit : X/Hockey India)
नवनीत आणि मुमताज या दोघींव्यतिरिक्त नेहाने 2 गोल केले. नेहाने 11 आणि 38 व्या मिनिटाला गोल केला. तसेच स्ट्रायकर लालरेम्सियामी हीने 13 व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी आणखी मजूबत करण्यात योगदान दिलं. तसेच शर्मिला देवी आणि ऋतुजा पिसळ या दोघींनी प्रत्येकी 1-1 गोल केला. भारताने अशाप्रकारे 52 व्या मिनिटाला 12-0 अशी आघाडी घेतली. (Photo Credit : X/Hockey India)