राहुरी: अहिल्यानगर-कोपरगाव रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्याचे काम घेणाऱ्या ठेकेदार कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांवर येत्या सात दिवसांत गुन्हे दाखल झाले नाहीत, तर तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
Honesty Employee :'साईंच्या दरबारातील टोकाचा विरोधाभास'; कंत्राटी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरातून कौतुकसोमवारी राहुरी तहसील कार्यालयावर रस्ता अपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबातील सदस्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी दशक्रिया विधी आंदोलन करत निषेध नोंदविला. तत्पूर्वी राहुरीतील अमरधाम येथे दशक्रिया उरकल्यानंतर संबंधित नातेवाईक मोर्चा घेऊन गेले.
मोर्चासमोर बोलताना तनपुरे म्हणाले की, या रस्त्याच्या कामाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी कुठे गेला? गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा आंदोलने झाली. या रस्त्यावर शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला. हजारो जणांना कायमचे अपंगत्व आले. मात्र, संबंधितांवर जबाबदारी निश्चिती केली जात नाही. त्यामुळे प्रचंड नाराजीची भावना निर्माण झाली आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे. रस्ता अपघातात मृतांच्या कुटुंबावर मोठा आघात होत असताना नागरिक आता शांत बसणार नाहीत.
येत्या सात दिवसांत गुन्हे दाखल करून दोषींना अटक केली नाही, तर नाईलाजास्तव अहिल्यानगर-कोपरगाव रस्ता अडवून केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधावे लागेल. सातत्याने मागणी करूनही रस्त्याचे काम हाती घेतले जात नाही. केवळ डागडुजी करून उपयोग होणार नाही. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, मुळा प्रवरा वीज संस्थेचे माजी संचालक आयुब पठाण, ज्ञानेश्वर जगधने, नीलेश जगधने, बाळासाहेब जाधव, विजय तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, ज्ञानेश्वर राक्षे, सूर्यकांत वाकचौरे यांची भाषणे झाली. या आंदोलनात महिला-लहान मुले व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मुंडण करून निषेध
अहिल्यानगर-कोपरगाव राष्ट्रीय महामार्गाच्या यंत्रणेच्या निषेधार्थ ज्ञानेश्वर जगधने, दत्तात्रेय जोगदंड यांनी मोर्चासमोरच मुंडण करून निषेध नोंदविला. अमरधाम येथील दशक्रिया विधी उरकल्यानंतर मृतांच्या कुटुंबातील सदस्यांनी शासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधले.
आनंदाची बातमी! 'गायीच्या दूध दरात तीन रुपयांपर्यंत वाढ'; सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार दूध उत्पादकांना दिलासा अन्यथा नागरिकांचा उद्रेक - तनपुरेदुरुस्तीच्या कामानंतर लगेच पुन्हा मोठे खड्डे पडतात. वाहनचालकांना कसरत करावी लागते. यातून दुचाकीस्वारांचे अपघात घडतात. त्यातून बळी जाण्याचे प्रकार होत आहे. खासदार नीलेश लंके यांनी मध्यंतरी उपोषण करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते, याची आठवण तनपुरे यांनी करून दिली. गेल्या आठ ते दहा दिवसांत राहुरीच्या हद्दीत तीन जणांचा अपघातात मृत्यू झाला, याकडे त्यांनी लक्ष वेधत संबंधित विभागाने तातडीने रस्त्याचे काम हाती घ्यावे; अन्यथा नागरिकांचा उद्रेक होईल, असेही तनपुरे म्हणाले.