गराडे, ता. ९ : ढुमेवाडी (ता. पुरंदर) येथे ‘ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव’ कार्यक्रमांतर्गत
कृषी महाविद्यालय, पुणेच्या कृषीकन्यांनी जीवाणू संवर्धन खतांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. त्यांनी रायझोबियम् या नत्र स्थिरीकरण जिवाणू खताचा वापर करून पेरणीपूर्व बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
कृषी महाविद्यालय, पुणे येथे उत्पादित रायझोबियम, ॲझेटोबॅक्टर, ॲसेटोबॅक्टर, स्फुरद जिवाणू संवर्धन (PSB), पोटॅश जिवाणू संवर्धन(KMB) अशा पर्यावरणपूरक जिवाणू खतांबद्दल देखील शेतकऱ्यांना माहिती सांगितली. या खतांमुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो, तर शेतीतील उत्पन्न सुमारे १०-१५ टक्क्यांनी वाढते.
जनजागृतीमध्ये अक्षदा गायकवाड, कावेरी गायकवाड, शीतल काळे, कोमल कांबळे, स्नेहल खंदारे, अक्षता क्षीरसागर, समिक्षा क्षीरसागर, मयुरी मुटकुळे, ऐश्वर्या वळवी आदी कृषिकन्यांचा समावेश होता.
कार्यक्रम कृषी महाविद्यालय पुण्याच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, केंद्र समन्वयक डॉ. विजय तरडे, केंद्रप्रमुख डॉ. स्वाती खांदवे, कार्यक्रम अधिकारी डॉ.पल्लवी सूर्यवंशी व डॉ. दीप्ती वाघधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.