पंचांगानुसार, यंदा पितृपक्ष 7 सप्टेंबरपासून म्हणजेच आज सुरू होत आहे आणि 21 सप्टेंबरला समाप्त होईल. याच दरम्यान, 14 सप्टेंबरला चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल, जिथे आधीपासूनच देवगुरु बृहस्पति विराजमान आहे. चंद्र आणि गुरु यांचा हा संयोग गजकेसरी राजयोग निर्माण करेल. ज्योतिष शास्त्रात गजकेसरी योग अत्यंत शुभ आणि शक्तिशाली मानला गेला आहे. त्यामुळे कोणत्या राशींना फायदा होणार चला जाणून घेऊया…
गज म्हणजे हत्ती आणि केसरी म्हणजे सिंह. हे दोन्ही शक्ती, साहस आणि धन-वैभव यांचे प्रतीक आहेत. हा योग व्यक्तीला अपार यश, मान-सन्मान आणि आर्थिक समृद्धी मिळवून देतो. हा गजकेसरी राजयोग 14 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. जवळपास १२ वर्षांनंतर हा योग आला आहे. पितृपक्षाच्या समाप्तीपर्यंत त्याचा शुभ प्रभाव कायम राहील. या काळात या तीन राशींच्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि जीवनात सकारात्मक बदल दिसतील. चला जाणून घेऊया कोणत्या 3 राशींसाठी हा गजकेसरी राजयोग वरदान ठरेल
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा योग उत्पन्नात प्रचंड वाढीचे संकेत देत आहे. गजकेसरी राजयोग तुमच्या राशीच्या अकराव्या भावात (आय आणि लाभाचा भाव) बनत आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत मोठा सुधारणा दिसेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील आणि तुम्ही गुंतवणुकीतूनही चांगला नफा मिळवू शकता. तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराकडून, मोठ्या भावंडांकडून लाभ मिळवू शकता. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी गजकेसरी राजयोग करिअर आणि व्यवसायात शानदार यश मिळवून देणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या कामात उत्तम कामगिरी कराल, ज्यामुळे तुमचा बॉस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढतीसह नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यापारी वर्गासाठी हा काळ खूप अनुकूल आहे. तुम्हाला मोठी ऑर्डर किंवा डील मिळू शकते. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकाल.
गजकेसरी राजयोग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी धनाचे नवे दरवाजे उघडे करणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभाचा योग येईल. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर पगारवाढ किंवा बढती मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठा नफा होण्याची शक्यता आहे. तुमच्या वाणीत गोडवा येईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. कुटुंबात सुख-समृद्धीचे वातावरण राहील.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)