90441
‘सिंधुदुर्ग राजा’ दरबारात
आज रक्तदान शिबिर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः श्री गणेश चतुर्थीनिमित्त आयोजित ‘श्री सिंधुदुर्ग राजा’च्या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून राणे परिवार आणि सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही २१ दिवसांसाठी ‘श्री सिंधुदुर्ग राजा’ विराजमान झाला आहे. या उत्सवादरम्यान धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसह आरोग्यविषयक उपक्रमांवरही भर देण्यात येत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ-मालवण विधानसभा क्षेत्रातर्फे श्री सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात उद्या (ता. १०) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ पासून शिबिर सुरू होईल. हे शिबिर श्री सिंधुदुर्ग राजा दरबार व्यासपीठ, कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ या संकल्पनेवर आधारित या शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.