जगाला आता अशा मोठ्या संकटाचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे पृथ्वीचा भूगोलही बदलू शकतो. 425 वर्षांपूर्वी असंच एक संकट जगावर आलं होतं. तेव्हा जर निसर्गानं आपलं रौद्र रूप दाखवलं तर काय होऊ शकतं? याचा अनुभव मानव जातीला आला होता, दरम्यान अलिकडेच ओरेगॉनाच्या किनारी भागात छोटे-छोटे भूकंपाचे धक्के बसले आहेत, मात्र ही काही सामान्य घटना नाहीये तर या भूकंपाच्या धक्क्यामुळे 425 वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, 425 वर्षांपूर्वी आलेल्या या शक्तिशाली भूकंपामुळे ओरेगॉनाचा संपूर्ण नकाशाच बदलून गेला आहे.
अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण विभाग (USGS) नुसार सोमवारी रात्री उशिरा या भागामध्ये 5.8 रिस्टल स्केलचा मोठा भूकंप झाला, त्यानंतर ओरेगॉनामध्ये तब्बल 12 पेक्षा अधिक भूकंपाचे धक्के जाणवले ज्याची तीव्रता 2.5 रिस्टल स्केलपेक्षा अधिक होती. या भूकंपांचे केंद्र कॅस्केडिया सबडक्शन झोनमध्ये होते, त्यामुळे या भागात आता मोठ्या भूकंपाचा धोका निर्माण झाला आहे.
अमेरिकेचा हा भाग सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. तिथे यापूर्वी देखील अनेक शक्तिशाली भूकंप आले आहेत. 17 व्या शतकात या भागात सर्वात मोठा भूकंप आला होता, 9 रिस्टल स्केल एवढी या भूकंपाची नोंद झाली होती, या भूकंपामुळे या भागाचा नकाशा बदलून गेला, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती.
दरम्यान आता पुन्हा एकदा भूगर्भीय तज्ज्ञांना अशाच एका मोठ्या संकटांची भीती सतावत आहे. फेडरल एमरजेन्सी मॅनेजमेंट या संस्थेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार जर पुन्हा या ठिकाणी असा भूकंप झाला तर त्सुनामी आणि भूंकपामध्ये कमीत कमी 8 हजारांपेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडू शकतात. तर अनेक जण जखमी होतील. जर ही घटना पुन्हा घडली तर या भागात 100 फुटांच्या लाटा निर्माण होतील, ही पृथ्वीवरची सर्वात भयानक त्सुनामी असेल या घटनेत प्रचंड नुकसान होईल. या सर्व पार्श्वभूमीवर आता तज्ज्ञांकडून अभ्यास सुरू आहे. या भागामध्ये भूकंपाचा धोका वाढला असून, सर्वत्र भीतीचं वातावरण असल्याचं पहायला मिळत आहे.