भारत अमेरिका संबंध सुधारणार संकेत, शेअर बाजारात 11 सप्टेंबरला ‘या’ स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडी
Marathi September 11, 2025 03:25 AM

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्यासंदर्भात दिलेले संकेत आणि त्याला नरेंद्र मोदींनी दिलेलं सकारात्मक उत्तर याशिवाय जागतिक बाजारातील मजबूत संकेतामुळं शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली.सेन्सेक्स 323.83 अंकांच्या तेजीसह 81425.15 अंकांवर पोहोचला. तर, निफ्टी 50 निर्देशांकात 104.50 अंकांची वाढ होऊन तो 24973.10 अंकांवर पोहोचला. गुरुवारी  11 सप्टेंबरला शेअर बाजारात काही मोठ्या कंपन्यांच्या स्टॉकवर गुंतवणूकदारांचं लक्ष राहील. यामध्ये ऑटो, फायनान्स, बँकिंग, फार्मा रिअल इस्टेट, या क्षेत्राशी संबंधित काही अपडेट समोर आल्या आहेत. त्यामुळं काही मोठ्या स्टॉकमध्ये घडामोडी दिसू शकतात.

टाटा मोटर्स (Tata Motors)

टाटा मोटर्सची उपकंपनी जॅग्वार लँड रोवरं एका सायबर प्रकरणाची माहिती दिली आह. ज्यामुळं डेटावर परिणाम झाला आहे. कंपनीनं जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांना पूर्णपणे देण्यासाठी VE कमर्शिअल गाड्यांच्या किमती 6 लाखांपर्यंत दर कमी करण्याची घोषणा केली आहे.

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)

बँक ऑफ बडोदानं ओवरनाईट MCLR दर 10 बेसिस पॉईंटनं कमी केले आहेत. ते 7.95 टक्क्यांवरुन 7.85 टक्क्यांवर आणले आहेत. हे बदल 12 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत. यामुळं ग्राहकांचं कर्ज स्वस्त होईल.

टेगा इंडस्ट्रीज

टेगा इंडस्ट्रीज नं Apollo Funds सोबत 150 कोटी डॉलर्सच्या  एंटरप्राइज मूल्यावर ग्लोबल ग्रायडिंग मिडिया सप्लायर मोलीकोपला खरेदी करण्याचं नियोजन केलं आहे. कंपनी 13 सप्टेंबरला बोर्ड मीटिंगमध्ये इक्विटी शेअर आणि इतर मार्गानं फंड उभारणीचा प्रयत्न करत आहे.

माझगाव डॉक  (Mazgaon Dock)

संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सनं भारतीय नौसनेसह सबरमरीन प्रकल्प P75(I)बाबत चर्चा सुरु केली आहे. या प्रकल्पामुळं भारताची समुद्रातील सामर्थ्य वाढणार आहे.

पंचतारांकित व्यवसाय

फाइव स्टार बिझनेस प्रायवेट प्लेसमेंटद्वारे एनसीडीद्वारे 4000 कोटी रुपये उभारणार आहे. ही रक्कम कंपनीच्या विस्तारासाठी आणि ऑपरेशन्ससाठी वापरणार आहे.

बजाज फिनसर्व

बजाज फिनसर्वनं ऑगस्ट महिन्यातील विमा व्यवसायाची आकडेवारी जाहीर केली आहे. बजाज एलियांन्झ लाइफ इन्शुरन्सचा एकूण प्रिमियम 1484.8 कोटीहोता. तर, ग्रॉस डायरेक्ट प्रिमियम 2063 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

कीस्टोन रिअल्टर्स

कीस्टोन रियल्टर्सनं खासगी प्लेसमेंटद्वारे एनसीडीच्या मार्गानं 375 कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जमा करण्यात आलेली रक्कम रिअल इस्टेट प्रकल्पात वापरली जाणार आहे.

आरव्हीएनएल (RVNL)

सरकारी रेल्वे कंपनी आरव्हीएनलनं वेस्ट सेंट्रल रेल्वेच्या 169 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावली.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.