गनपॉईंटवर क्रिकेटपटूंनी लुटले: क्रिकेट जगतातून एक अतिशय धक्कादायक बातमी आली आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. दोन क्रिकेटपटूंना सार्वजनिक ठिकाणी बंदुकीच्या धाकावर लूटल्याची घटना समोर आली आहे. या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. खरंतर, कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL 2025) मध्ये खेळणाऱ्या दोन क्रिकेटपटूंसोबत ही घटना घडली. 9 सप्टेंबरच्या पहाटे बार्बाडोसमध्ये सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स संघाच्या दोन खेळाडूंसोबत ही घटना घडली. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत सहभागी असलेल्या खेळाडूंमध्ये भीतीचं सावट पसरलं आहे. इतकेच नाही तर सीपीएलच्या एका अधिकाऱ्यालाही बंदुकीच्या धाकावर लुटण्यात आले.
घटना नेमकी कशी घडली?
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना 9 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या (CPL Cricketers Robbed At Gunpoint In Barbados) आधी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही एका खाजगी कार्यक्रमातून परतत होते. या दरम्यान, जेव्हा ते हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वी काहीतरी खाण्यासाठी थांबले, तेव्हा काही दरोडेखोरांनी त्यांना घेरले आणि बंदुकीने धमकावू लागले. बंदुकीच्या धाकावर त्यांनी दागिने, मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या. यावेळी एका दरोडेखोराची बंदूक खाली पडली असून पोलिसांनी ती जप्त केली आणि तपास सुरू केला आहे.
खेळाडू सुरक्षित! संघाकडून पुष्टी
सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स फ्रँचायझीकडून या घटनेला दुजोरा दिला आहे. असेही सांगण्यात आले आहे की या घटनेत खेळाडू आणि सीपीएल अधिकारी दोघांनाही कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही आणि सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत. यावेळी संबंधित खेळाडूंची आणि अधिकाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.
पुढच्या सामन्याची तयारी सुरू
या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण लीग हादरली असली तरी संघ व्यवस्थापन आणि CPL प्रशासनाने सर्व खेळाडूंना पूर्ण सुरक्षा दिली जाईल, असा विश्वास दिला आहे. विशेष म्हणजे, या घटनेचा संघावर फारसा परिणाम झाला नाही. सेंट किट्सचे खेळाडू 11 सप्टेंबरला होणाऱ्या सामन्यासाठी सरावाला देखील लागले आहेत. पण, या हल्ल्याचे बळी ठरलेले खेळाडू पुढील सामन्यात उतरतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हे ही वाचा –
आणखी वाचा