Nepal Protest : लष्कराचा पुन्हा गोळीबार, नेपाळमधील हिंसाचार थांबेना, भारत अलर्ट मोडवर, भारताच्या सीमेवर…
GH News September 11, 2025 01:23 PM

सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर नेपाळमध्ये मोठा उद्रेक झाल्याचे बघायला मिळाले. न्यायपालिका, संसद, प्रधानमंत्री निवासस्थान अशा अनेक ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ केली. फक्त हेच नाही तर त्यांच्या निशाण्यावर थेट मंत्र्यांची घरे देखील होती. काही मंत्र्यांना घराबाहेर खेचत घराला आग लावून बेदम मारहाण केल्याची घटना देखील नेपाळमध्ये घडलीये. भारतातील अनेक पर्यटक हे सध्या नेपाळमध्ये अडकून पडली आहेत. काडमांडू विमानतळावर सध्या लष्कराचा ताबा आहे. नेपाळमधील परिस्थिती पूर्णपणे चिघळताना दिसली. अनेक मंत्र्यांनी देखील आपल्या पदाची राजीनामे दिली आहेत. नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले जातंय.

नेपाळमधील चिघळलेल्या परिस्थितीमध्ये भारतात देखील महत्वाची बैठक घेण्यात आली. नेपाळ आणि भारतातील सीमा भागात सुरक्षा वाढवण्यात आलीये. नेपाळमध्ये अशांतता आणि राजकीय अस्थिरतेचा सुरूच आहे. मात्र, नेपाळमधील परिस्थितीमुळे भारतात देखील काही भागात अलर्ट जारी केलाय. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय पर्यटकांना बाहेर कसे काढायचे यासाठी सरकारचे सध्या प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, नेपाळमधील रामेछाप येथील तुरुंगातून कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर लष्कराने गोळीबार केला. लष्कराने केलेल्या या गोळीबारात दोन कैद्यांचा जीव गेल्याची माहिती मिळतंय. सध्या नेपाळमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये अनेक कैद्यांनी तुरुंगातून पळ काढल्याची माहिती मिळतंय. अनेक कैदी बाहेर आल्याने प्रशासनाचा तणाव वाढणार असल्याचे स्पष्ट आहे. कैद्यांना तुरुंगातून बाहेर येण्यापासून लष्कराने रोखले. यादरम्यान करण्यात आलेल्या गोळीबारात दहा कैदी जखमी झाल्याचीही माहिती मिळतंय.

काठमांडू तुरुंगातून पळून गेलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला एसएसबीने पकडले होते. सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली या व्यक्तीला नेपाळमध्ये पाच वर्षांची शिक्षा झाली होती. यादरम्यानच्या काळात त्याने तुरुंगातून पळ काढला. नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर भारताची करडी नजर आहे. नेपाळमध्ये हा हिंसाचार चीनने घडून आल्याचे बोलले जातंय. मुंबईसह पुण्यातील पर्यटक या हिंसाचारामुळे नेपाळमध्ये अडकली आहेत. हेच नाही तर अनेक विमान कंपन्यांनी नेपाळला जाणारी आपली विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.