Kunickaa Sadanand and Kumar Sanu: ‘बिग बॉस 19’च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री कुनिका सदानंद तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिली. कुनिका आणि गायक कुमार सानू यांच्या नात्याने एकेकाळी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. हे दोघं जवळपास पाच वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. विशेष म्हणजे त्यावेळी कुमार सानू हे विवाहित होते. कुनिकाने कधीच त्यांचं नातं लपवण्याचा प्रयत्न केला नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचा मुलगा अयान लाल याने पहिल्यांदाच आईच्या त्या गाजलेल्या अफेअरविषयी प्रतिक्रिया दिली. आईला पाठिंबा देण्यासाठी अयान काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातही गेला होता. ‘वीकेंड का वार’ एपिसोडच्या काही दिवसांनंतर त्याने आरजे सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. त्यात तो आईविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.
आई कुनिका आणि कुमार सानूयांच्या रिलेशनशिपविषयी कधी समजलं असा प्रश्न विचारला असता अयान म्हणाला, “मला खूप उशिरा त्यांच्याबद्दल समजलं होतं. तोपर्यंत त्यांचा ब्रेकअप झाला होता. त्यावेळी आई फक्त 27 वर्षांची होती. जेव्हा ती दिवसभर त्यांचीच गाणी गुणगुणायची, तेव्हा मला समजलं (हसतो). मी मस्करी करतोय. पण एक गायक म्हणून तिला त्यांचं खूप कौतुक आहे. ती अजूनही त्यांची गाणी गाते. लोकं म्हणतात की त्यांचं अफेअर जवळपास 27 वर्षे होतं. पण जेव्हा हे सगळं घडलं, तेव्हा ती 27 वर्षांची होती असं आई सांगते. त्या दोघांचं नातं काही वर्षेच टिकलं. त्यानंतर वयाच्या 35 व्या वर्षी तिने मला जन्म दिला.”
आजही कुनिकाचं कुमार सानूवर प्रेम आहे का?या मुलाखतीत सिद्धार्थने अयानला थेट प्रश्न विचारला की, तिच्या मनात आजही कुमार सानू यांच्याविषयी काही भावना आहेत का? ती आजही त्यांच्यावर प्रेम करते का? त्यावर अयानने स्पष्ट उत्तर दिलं की, “तिला खरोखर त्या कलाकारावर प्रेम आहे. पण मी खात्रीने सांगतो की ती आता त्या माणसावर प्रेम करत नाही. प्रेमात आकंठ बुडून वेडं वगैरे होणं, माझ्या आईला जमत नाही. ती तशी नाहीये. यात तिचा अहंकारही नाही. जेव्हा मी त्यांच्याविषयी गुगलवर सर्च केलं आणि नंतर तिला विचारलं, तेव्हा ती मला म्हणाली, तो माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा पुरुष होता. त्याच्याकडे मी एक जोडीदार म्हणून पाहायचे आणि प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अशा प्रकारचं प्रेम अनुभवलं पाहिजे. ते टॉक्सिक होतं, खूप खूप टॉक्सिक.”