बजाज समूहाची कंपनी देणार बंपर Dividend, संचालक मंडळाच्या बैठकीची तारीख निश्चित
ET Marathi September 11, 2025 05:45 PM
मुंबई : बजाज समूहातील कंपनी बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडने त्यांच्या भागधारकांसाठी अंतरिम लाभांश जाहीर करण्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीची तारीख निश्चित केली आहे. Bajaj Holdings and Investments चे संचालक मंडळ १६ सप्टेंबर २०२५ रोजी या प्रस्तावावर चर्चा करेल. dividend जाहीर झाला तर तो चालू आर्थिक वर्षातील कंपनीचा पहिला अंतरिम लाभांश असेल.



Bajaj Holdings and Investments ने त्यांच्या भागधारकांना dividend देण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच, २७ जून २०२५ रोजी कंपनीने प्रति शेअर २८ रुपये अंतिम लाभांश दिला होता. यापूर्वी, सप्टेंबर २०२४ मध्ये प्रति शेअर ६५ रुपयांचा अंतरिम लाभांश आणि जून २०२४ मध्ये प्रति शेअर २१ रुपयांचा अंतिम लाभांश देण्यात आला होता. २०२३ मध्ये कंपनीने दोनदा लाभांश दिला. सप्टेंबर २०२३ मध्ये प्रति शेअर ११० रुपयांचा अंतरिम लाभांश आणि जून २०२३ मध्ये प्रति शेअर १३ रुपये अंतिम लाभांश देण्यात आला.



बजाज होल्डिंग्ज हा भारतीय शेअर बाजारातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. शेअर्सने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत शेअरची किंमत २,४६० रुपयांवरून १३,०९९ रुपये प्रति शेअर झाली आहे. शेअर्सने पाच वर्षात ४३०% परतावा दिला आहे.



बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट्स त्याच्या मागील बंद किमतीच्या तुलनेत १३१४० रुपयांवर व्यवहार करत आहे. बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट्सने या वर्षी ९.८२% आणि गेल्या ५ दिवसांत ०.२४% परतावा दिला आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने ३,४८६.५१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.



३० जून २०२५ रोजी बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंटमध्ये म्युच्युअल फंडचा वाटा ६.०५% होता. मागील तिमाहीच्या तुलनेत म्युच्युअल फंडाचा वाटा वाढला आहे. ३० जून २०२५ रोजी बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंटमध्ये एफआयआयचा वाटा १०.३१% होता. मागील तिमाहीच्या तुलनेत एफआयआयचा वाटा कमी झाला आहे.



© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.