मराठी चित्रपटसृष्टीमधील मोजकेच अभिनेते आहेत जे सामाजिक विषयांवर बिनधास्त मत मांडताना दिसतात. त्यामधील एक अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. त्याने आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याची ‘पुढचं पाऊल’ ही मालिका विशेष गाजली होती. या मालिकेतून तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला होता. आता अस्ताद त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहेत. या पोस्टमध्ये त्याने कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची तुलना राजकारण्यांशी केली आहे.
अस्ताद काळेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने भयाण वास्तवाची जाणीव करुन दिली आहे. राजकारणी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची त्यांने तुलना केली आहे. दोघांच्याही वेतन आणि काम यांच्यातील फरकावर त्याने ताशेरे ओढले आहेत.
वाचा: पितृपक्षात 12 वर्षांनंतर गजकेसरी राजयोग, या 3 राशींचे चमकणार नशीब, होईल धनवर्षाव!
View this post on Instagram
A post shared by Aastad Sunita Pramod Kale (@aastadkale)
काय आहे अस्ताद काळेची पोस्ट?
“कॉर्पोरेट असो, आय.टी असो, बँकिंग असो…. या सर्व क्षेत्रांमध्ये महिन्याला साधारण रु.2,50,000/- ते रु.4,50,000/- एवढा पगार मिळवणारे लोक हे मोठ्या पदांवर असतात, अधिकारी असतात. त्यांना तिथपर्यंत पोचायला बऱ्यापैकी उच्च शिक्षण घेणं आवश्यक असतं. त्यांनी काही महिने जरी कामात टाळाटाळ केली, जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत तर त्यांची नोकरी अथवा त्यांचं पद धोक्यात येऊ शकतं. शिवाय सरकारी बँकेतले, कंपनीतले कर्मचारी/अधिकारी असाल तर ठराविक वयाचे झाल्यावर तुम्हाला निवृत्त व्हावंच लागतं…” असे अस्ताद म्हणाला.
राजकारण हे एकमेव क्षेत्र जिथे शिक्षणाची मूलभूत अट नाही
पुढे अस्ताद म्हणाला, “मात्र……!!!!! राजकारण हे एकमेव क्षेत्र असं आहे, जिथे शिक्षणाची मूलभूत काहीही अट नाही. लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून निवडून आलात की पुढची 5 वर्ष तुमचा हा पगार, भत्ते वगैरे चालू असतं. दुसऱ्यांदा निवडून आलात की, त्यात वाढही होते. आणि या 5 वर्षांमध्ये तुम्ही धड काम नाही केलंत, जबाबदाऱ्या पार नाही पाडल्यात, तरी तुमची हकालपट्टी होत नाही. आणि ही कामं, जबाबदाऱ्या या गावं, शहरं, राज्यं आणि देश चालवण्याशी निगडित आहे राव !!! आणि वयोमानपरत्वे निवृत्तीची सक्तीही नाही. मज्जाच मज्जा आहे बुवा सगळी !!!!!” सध्या सोशल मीडियावर अस्तादची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.