किरण मानेची वादग्रस्त पोस्ट व्हायरल; एबीव्हीपीची कारवाईची मागणी, पोस्टमध्ये म्हणाले...'भक्तडुक्कर पिलावळींनो...'
esakal September 12, 2025 05:45 AM

अभिनेता किरण माने त्यांच्या वक्तव्याची नेहमीच चर्चेत असतात. ते नेहमीच चालू घडामोडीवर सोशल मीडियावर भाष्य करत असतात. त्यांच्या राजकीय, सामाजिक पोस्ट कधी कधी वादाचं कारण सुद्धा ठरतात. अशातच आता किरण माने मोदीवर टीका करताना दिसत आहे. त्यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा वादाला सुरुवात झाली आहे.

सध्या नेपाळमध्ये वातावरण बिघडलं आहे. नेपाळची परिस्थिती अत्यंत नाजून आहे. दरम्यान अशातच आता किरण मानेने नेपाळमधल्या आंदोलनावर भाष्य केलय. फेसबुकवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर भाजपने आक्षेप घेत कारवाई करण्याची मागणी केलीय. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

सध्या किरण मानेच्या पोस्टमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. या पोस्टवरुन आता नाशिकमधील एबीव्हीपीकडून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तसंच किरण मानेवर कारवाईची मागणी करण्यात आलीय. नेपाळमधील आंदोलनावर भाष्य करताना किरण माने यांनी लोकशाहीविरोधात लोकांना प्रवृत्त करण्याची पोस्ट केल्याचा दावा करण्यात आलाय.

अभिनेता किरण मानेविरोधात सागर तानाजी शेलार या तरुणाने तक्रार दाखल केल्याचं बोललं जातय. किरण मानेंनी शेअर केलेली पोस्ट ही नरेंद्र मोदी, अमित शाह , देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील आहे. तसंच या पोस्टमधील मजकूर अवमानकारक असल्याचं म्हटलं गेलय. सध्या किरण मानेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

9 सप्टेंबरमध्ये किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये किरण माने म्हणाले की, 'भक्तडुक्कर पिलावळींनो नेपाळ बघताय ना? आपल्याकडे फरक इतकाच आहे की रंगा बिल्ला अनाजीपंतासोबत तुम्ही पिसले जाणार आहे. सुट्टी नॉट' असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलय. सध्या सोशल मीडियावर त्यांची पोस्ट व्हायरल होतेय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.