सातबारा दस्तावेजांचे लिंकिंग पूर्ण करा
esakal September 14, 2025 08:45 AM

पौड, ता. १३ : मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा दस्तावेजांचे लिंकिंग पूर्ण करावे, अशी मागणी स्वराज पक्षाचे तालुका अध्यक्ष राजू फाले यांनी मुळशी, मावळचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी नवले यांना निवेदन दिले.
तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी आणि सातबारा दस्तावेजांची लिंकिंग प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचे अर्ज करण्यास मोठ्या अडचणी येत आहे. ट्रॅक्टर खरेदी, आधुनिक अवजारे, अनुदाने यांसारख्या योजनांपासून शेतकरी वंचित राहत आहेत.
सरकारी संकेतस्थळांवरील वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे (सर्व्हर डाऊन) शेतकऱ्यांना अर्ज भरताना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून योजनांपासूनही शेतकऱ्यांना वंचित राहावे लागते. त्यामुळे ऑनलाइन प्रक्रिया सहज आणि सुलभ करावी. तहसील व तलाठी कार्यालयातील सेवेत पारदर्शकता ठेवून शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.